शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत शाळांमध्ये ‘विद्यार्थी समूह (Student Clubs)’ पुनर्गठन करणेबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत शाळांमध्ये ‘विद्यार्थी समूह (Student Clubs)’ पुनर्गठन करणेबाबत

संदर्भ: १. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०.

२. राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) – २०२४.

३. प्रस्तुत परिषदेचे पत्र जा.क्र. राशैसंवप्रप/साव्यावि/ विद्यार्थी समूह/ १४०४७८४ दि. ०३-०९-२०२५

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) – २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF)- २०२४ यानुसार शिक्षणाचा उद्देश केवळ पाठांतर किंवा पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, सर्जनशील, शारीरिक व व्यावसायिक सर्वांगीण विकास साधणे हा आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवडीनिवडी, कल्पकता व कौशल्यांना वाव देणारे अनुभवाधारित व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण हे प्रमुख ध्येय आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राज्य मंडळाच्या अधिनस्थ सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये (प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय) स्थापन करण्यात आलेले ‘विद्यार्थी समूह (Student Clubs)’ हे विद्यार्थ्यांना नेतृत्व, सहकार्य, प्रयोगशीलता व सामाजिक सहभागाची संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थी समूहांचे पुनर्गठन करून त्यांना अधिक प्रभावी व परिणामकारक बनविणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा विकास होऊन शाळांमध्ये समान संधी, समावेशन, कौशल्याधारित शिक्षण व नेतृत्वगुणांचा विकास साध्य होईल. या संदर्भात सर्व संबंधित अधिकारी व शिक्षकांनी उपरोक्त संदर्भ क्र. ३ च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

१. विद्यार्थी समूह पुनर्गठन करणेसाठीचे वेळापत्रक :

२. अंमलबजावणी व संनियंत्रणः

जिल्हा नोडल अधिकारी: प्रभावी संनियंत्रणासाठी प्रत्येक ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने’ (DIET) एक अधिव्याख्याता यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी व सदरील माहिती कार्यक्षेत्रातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत शाळांपर्यंत तात्काळ पोहोचवावी.

> पर्यवेक्षकीय भूमिकाः गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी विद्यार्थी समूहांच्या कामकाजाचे निरंतर मार्गदर्शन व संनियंत्रण करावे.

> मार्गदर्शिका उपलब्धताः विद्यार्थी समूहांची रचना, उपक्रम व कामकाजाबाबतची सविस्तर ‘विद्यार्थी समूह – मार्गदर्शिका (शाळा/ वर्ग स्तर)’ ही पुस्तिका SCERT च्या अधिकृत संकेतस्थळावरील पुढील link वर उपलब्ध आहे.

https://www.maa.ac.in/documents/Vidyarthi Samuh.pdf

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दि. २० ऑगस्ट २०२६ पर्यंत विद्यार्थी समूहांचे पुनर्गठन करून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात यावेत. तसेच स्थापन केलेल्या विद्यार्थी समूहांची प्रत्येक शाळेत सुयोग्य स्थापना, कार्यान्वयन व जिल्ह्यातील विविध स्तरावर सुयोग्य समन्वयन व्हावे यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी/ पर्यवेक्षकीय अधिकारी/ मुख्याध्यापक/ शिक्षक यांना उपरोक्त संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानुसार शाळा/ वर्ग स्तरावर सन २०२६-२७ मध्ये स्थापन केलेल्या विद्यार्थी समूहाची माहिती खालील नमुन्यात स्तरनिहाय संकलित करावी. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी DIET प्राचार्य यांचेमार्फत फक्त राज्यस्तर नमुना क्र. ४ मधील माहिती ही दि. ०७-०९-२०२६ पर्यंत परिषदेस cpddept@maa.ac.in या E-mail वर Excel व pdf स्वरुपात सादर करावी.

नमुना क्र. १: केंद्र स्तर माहिती संकलन नमुनाः

नमुना क्र. ४: राज्य स्तर माहिती संकलन नमुनाः

सदर माहिती ही विहित मुदतीत विनाविलंब सादर करावी. तसेच ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने’ (DIET) जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या अधिव्याख्याता यांचे नाव संपर्क क्र. व E-mail ID ही माहिती CPD विभागास cpddept@maa.ac.in या E- mail वर कळवावी.

Related posts:

Leave a Comment