शालेय शिक्षण विभाग स्तरावर Capacity Building Plan – CBP तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर “Capacity Unit (CBU)” गठीत Building करण्याबाबत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभाग स्तरावर Capacity Building Plan – CBP तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर “Capacity Unit (CBU)” गठीत Building करण्याबाबत

संदर्भ: १

) सदस्य, क्षमता विकास आयोग, भारत सरकार यांचे पत्र क्र.D.O. NO. ३४६/Member (Admn.)/CBC-२०२६, दिनांक ०६ मार्च, २०२६ रोजीचे पत्र

२) उप सचिव (प्रशि-५), सामान्य प्रशासन विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०७/प्रशि-५. दिनांक १६.०४.२०२६

प्रस्तावना:-

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना ‘विकसित महाराष्ट्र’ मोहिमेसाठी सक्षम करणे हे शासनाचे ध्येय आहे. केंद्रशासनाच्या क्षमता विकास आयोगाच्या (CBC) संदर्भक्र.१ येथील पत्रान्वये प्रत्येक विभागाने आपला स्वतंत्र क्षमता बांधणी आराखडा (Capacity Building Plan – CBP) तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वृद्धी करण्यासाठी प्रत्येक विभागाने संवर्ग निहाय स्वतंत्र क्षमता बांधणी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये प्रत्येक प्रशासकीय विभागाने क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावर क्षमता बांधणी घटक (Capacity Building Unit (CBU) गठीत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाचा क्षमता बांधणी आराखडा तयार करण्यासाठी प्रशासकीय विभाग स्तरावरील क्षमता बांधणी घटक गठीत करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

शालेय शिक्षण विभाग स्तरावर क्षमता बांधणी आराखडा (Capacity Building Plan – CBP) तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रशासकीय विभाग स्तरावरील Capacity Building Unit (CBU) गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

२. Capacity Building Unit (CBU) ची कार्यकक्षाः

1. विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाशी संबंधित गरजांचे विश्लेषण करणे आणि क्षमता बांधणी आराखडा राबविण्यासाठी ‘नोडल संस्था (Nodal Body) म्हणून काम करणे.

II. विभागातील विविध संवर्गातील पदांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या विचारात घेवून त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर आधारीत क्षमता बांधणी आराखडा तयार करणे. हा आराखडा तयार करताना चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्टे आणि भविष्यातील गरजा यांचा विचार करावा. तसेच यासाठी ‘IGOT-कर्मयोगी’ या व्यासपीठावर उपलब्ध असलेल्या AI आधारीत साधनांचा वापर करणे.

III. विभागांनी केवळ पारंपारिक प्रशिक्षणावर अवलंबून न राहता, ऑनलाईन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण (In-person आणि On-the-job training) अशा संमिश्र प्रशिक्षण पद्धतीचा अवलंब करणे.

IV. राज्याने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार विभागाच्या क्षमता बांधणी आराखड्याची निर्मिती व अंमलबजावणी करणे, नियतकालिक आढावा घेणे.

V. IGOTकर्मयोगी या पोर्टलवर विभागातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांची नोंदणी (Onboarding) आणि प्रशिक्षणाचे पर्यवेक्षण करणे, तसेच ऑनलाइन अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण होतील आणि ऑफलाइन कार्यशाळा/प्रशिक्षणांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल, याची खातरजमा करणे.

VI. सर्व प्रकारच्या प्रशिक्षणासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि यशदा यांच्याशी समन्वय साधणे.

VII. क्षमता बांधणी आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेणे व त्यानुषंगाने वेळोवेळी बैठका आयोजित करणे.

VIII. विभागातील सर्व संवर्गासाठी तयार करण्यात आलेला क्षमता बांधणी आराखड्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करणे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०६०२१२२८३६९९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment