राज्यातील खाजगी विनाअनुदानावरून अंशतः व पूर्णत अनुदानावर बदलीबाबत anudanit badli paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील खाजगी विनाअनुदानावरून अंशतः व पूर्णत अनुदानावर बदलीबाबत anudanit badli paripatrak

संदर्भ :-

१. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.

२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१.

३. शासन परिपत्रक क्रमांक. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३२/१६/टीएनटी-२ दि.२८.०६.२०१६

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०८.०६.२०२०.

५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०१.०४.२०२१.

६. शासन परिपत्रक समक्रमांक दि.०१.१२.२०२२

७. रिट याचिका क्र. १५५२६/२०२३ सौ. शिंदे प्रितम मंगेश विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दि.२२.०१.२०२४ चे आदेश.

८. श्री. नितीन भिका ताडगे व इतर रिट याचिका क्र. २०४/२०१९ प्रकरणी मा. न्यायालयाने

दि.१६.०४.२०२४ रोजी दिलेले आदेश.

९. फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विरुध्द महाराष्ट्र राज्य रिट याचिका क.८२१५/२०२२ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.२१.०७.२०२३ रोजी दिलेले आदेश.

१०. शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.२९.०४.२०२४

११. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.०३.१०.२०२४.

१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दि.१३.११.२०२५.

१३. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/बिना-अनु बदली /कार्यासन-टि-४/टि-२/१८११६४३/२७.०३.२०२६

राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळा अथवा तकडी मधन अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तकडीतील रिक्त पदावर बदलीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबतचे अधिकार दि.१३.११.२०२५ च्या अधिसूचनेने आयुक्त (शिक्षण) यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विनाअनुदानित वरुन अंशत: अनुदानावरतसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल संस्था लॉगीन व

शिक्षणाधिकारी लॉगीन कार्यान्वित करण्यात आल्याचे संचालनालयाचे संदर्भ क्र १३ अन्वये आपणांस कळविण्यात आले होते.

सबब राज्यातील विनाअनुदानित वरून अंशतः अनदानावर तसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल ची वेबसाईट व कार्यपध्दतीची माहिती सोबत जोडलेल्या प्र-पत्रात दिली आहे. तसेच वेबसाईटवर मार्गदर्शक सुचीचा (अपडेटेड युजर मॅन्युअल) समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोबत जोडलेल्या प्र-पत्रातील कार्यपध्दतीनुसार संस्था/शाळा स्तरावरुन परिपूर्ण प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणेकामी आवश्यक निर्देश आपल्या अधिनस्त कार्यालयांना आपल्यास्तरावरुन देण्यात यावेत.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment