विस्तारीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणा करण्याबाबत ayushyaman bharat pradhanmantri janarogya yojana circular
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२६/ ई१६२१२१६/MJPJAY&AB-PMJAY जी.टी. रूग्णालय आवार, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई.
दि. १५ ऑक्टोबर, २०२६
वाचा :-
१. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२३/प्र.क्र.१६०/आरोग्य – ६. दि. २८ जुलै, २०२३.
२. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२५/प्र.क्र.८६/ई-१०४४४९४/आरोग्य – ६. दि. १७ एप्रिल, २०२५.
3. Office Memorandum No.S-१२०१८/२३/२०१९ – NHA Dated २५-०८-२०२५ by Government of India- Ministry of Health & Family Welfare (National Health Authority)
४. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२५/ई-१०४४४९४/ MJPJAY&AB-PMJAY दि. ४ नोव्हेंबर, २०२५.
५. राज्य आरोग्य हमी सोसायटी यांचेकडील पत्र क्र. राआहसो/प्रिऑथ/वकास/११६७५/२१८३/२०२६ दि. ०७/१०/२०२६
प्रस्तावना :-
विस्तारीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दि. २८.०७.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या उपचारांच्या यादीत व त्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत उपरोक्त वाचा क्र. ४ मधील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार निश्चित करण्यात आलेल्या एकूण २३९९ उपचारांची यादी उक्त शासन निर्णयाच्या परिशिष्ट – १ मध्ये नमूद करण्यात आली आहे. यापैकी शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवलेल्या २२३ उपचारांची यादी उक्त शासन निर्णयाच्या परिशिष्ट २ मध्ये नमूद करण्यात आली आहे. सदर उपचारांची अंमलबजावणी दि. २४.०२.२०२६ पासून केंद्र शासनाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या TMS २.० प्रणालीव्दारे सुरु करण्यात आली आहे.
२. सदर उपचारांपैकी कर्करोग या विशेषज्ञ सेवेतील उपचारांमध्ये Positron Emission Tomography -Computed Tomography (PET-CT) ही निदान प्रक्रिया काही उपचारांसाठी अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add on Diagnostic Procedure) म्हणून समाविष्ट करावी. तसेच PET-CT या निदान प्रक्रियेचा स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) उपचार प्रक्रिया म्हणून समावेश करण्यात यावा अशा आशयाच्या मागण्या वारंवार प्राप्त होत होत्या. त्यानुसार उपरोक्त वाचा क्र. २ मधील शासन निर्णयान्वये आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या अभ्यास समितीस याविषयी अहवाल सादर करण्यास कळविण्यात आले होते. सदर अभ्यास समितीचा अहवाल उपरोक्त वाचा क्र. ५ अन्वये शासनास प्राप्त झाला आहे.
३. उपरोक्त वाचा क्र. ४ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १. (३) नुसार योजनेअंतर्गत समग्र यादीतील उपचारांची अंमलबजावणी सुर झाल्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन एकूण उपचारांची संख्या निश्चित करणे, उपचारांच्या संख्येत, वर्णनात व दरात बदल करणे, शासकीय राखीव उपचार यामध्ये भर घालणे किंवा कमी करणे, अपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव उपचार खाजगी रुग्णालयांना खुले करणे याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना राहतील, अशी तरतूद आहे.
४. उपरोक्त वाचा क्र. ४ मधील शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या २३९९ उपचारांच्या समग्र यादीत कर्करोगावरील उपचारांशी संबंधित एकूण ५१५ उपचारांचा समावेश आहे. त्यापैकी ४४ उपचारांकरिता PET-CT निदान प्रक्रिया पॅकेजसोबत अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add on Diagnostic Procedure) म्हणून समाविष्ट आहे. त्याशिवाय अभ्यास समितीने, अतिरिक्त ६३ उपचारांकरिता PET-CT निदान प्रक्रिया पॅकेजसोबत अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add on Diagnostic Procedure) म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. तसेच PET-CT निदान प्रक्रिया विशिष्ट निकषांची पूर्तता करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयांसाठी स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) प्रक्रिया म्हणून समाविष्ट करण्याची समितीने शिफारस केली आहे.
५. कर्करोग उपचारांशी संबंधित PET-CT निदान प्रक्रिया समाविष्ट करण्याबाबत अभ्यास समितीने केलेल्या शिफारसी मान्य करुन त्या लागू करण्यासाठी तसेच वाचा क्र. ३ अन्वये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने समाविष्ट केलेल्या “Post-Transplant Package (After Completion of १२ months)”- Package code: OT००१G याचा समावेश करण्यासाठी उपरोक्त वाचा क्र. ४ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट १ मधील उपचारांच्या समग्र यादीत सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१. विस्तारीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपरोक्त वाचा क्र. ३ मधील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या २३९९ उपचाराच्या समग्र यादीपैकी यासोबतच्या परिशिष्ट-१ मध्ये नमूद केलेल्या एकूण ६३ कर्करोग उपचारांकरिता Positron Emission Tomography – Computed Tomography (PET-CT) ही निदान प्रक्रिया, अतिरिक्त निदान प्रक्रिया (Add on Diagnostic Procedure) म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. याशिवाय, सोबतच्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद केलेल्या ज्या विशिष्ट कर्करोगांसाठी (Malignancies) रोगाचे टप्पानिर्धारण (Staging), उपचारास प्रतिसादाचे मूल्यमापन (Response Assessment) तसेच रोगाच्या पुनरावृत्तीचे मूल्यमापन (Recurrence Evaluation) करण्यासाठी Diagnostic PET-CT Scan ची वैद्यकीय उपयुक्तता स्थापित झालेली आहे, अशा निवडक १३ प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे पूर्तता करण्याच्या अधिन राहून PET-CT निदान प्रक्रिया ही स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) प्रक्रिया म्हणून समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. अंगीकृत रुग्णालयांसाठी पात्रता व अटी:-
१. PET-CT ही स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) निदान प्रक्रिया केवळ परिशिष्ट-२ मध्ये नमूद केलेल्या एकूण १३ प्रकारच्या कर्करोग उपचार सुविधा देण्यासाठी पात्र असलेल्या अंगीकृत रुग्णालयांमार्फत अनुज्ञेय राहील. PET-CT तपासणी करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयात आवश्यक तांत्रिक सुविधा, उपकरणे व पात्र मनुष्यबळासह स्वतःचे (In-house) PET-CT केंद्र उपलब्ध असणे आवश्यक राहील, PET-CT तपासणीची आवश्यकता संबंधित तज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेली असावी.
२. PET-CT या स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) निदान प्रक्रियेसाठी पूर्वमान्यता (Pre-Authorization) प्राप्त करणे संबंधित अंगीकृत रुग्णालयास बंधनकारक राहील. परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्यानुसार पूर्वमान्यतेसाठी रुग्णाचा निदान अहवाल, कर्करोगाचा प्रकार व टप्पानिर्धारण, तपासणीची वैद्यकीय आवश्यकता, संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचे अभिप्राय आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करणे तसेच दावा सादर करताना तपासणीचा अहवाल, आवश्यक वैद्यकीय नोंदी व योजनेंतर्गत विहित केलेली इतर कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. या व्यतिरिक्त कोणत्याही बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्यास, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अभिप्राय घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीने निर्गमित केलेले आदेश बंधनकारक राहतील.
४. PET-CT या स्वतंत्र/नियमित (Regular/Primary) निदान प्रक्रियेचे दर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या HBP २०२२ मधील Add-on Procedure साठी निर्धारित केलेल्या दरानुसार खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत-

५. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला प्रस्ताव सादर करुन संबंधित संगणक TMS २.० प्रणालीमध्ये आवश्यक बदल करुन घ्यावेत.
६. याशिवाय, वाचा क्र. ३ अन्वये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने HBP २०२२ मध्ये समाविष्ट केलेल्या “Post-Transplant Package (After Completion of १२ months)” – Package code: OT००१G याचा समावेश उपरोक्त वाचा क्र. ४ च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-१ च्या उपचारांच्या समग्र यादीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
19. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१०१५१३२२३४९३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने










