संयुक्त शाळा अनुदानांतर्गत स्वच्छता अॅक्शन प्लॅनसाठी मंजूर १०% अनुदानातून विशेष शालेय स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध कामे करण्याबाबत sanyukta shala anudan action plan circular 

संयुक्त शाळा अनुदानांतर्गत स्वच्छता अॅक्शन प्लॅनसाठी मंजूर १०% अनुदानातून विशेष शालेय स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध कामे करण्याबाबत sanyukta shala anudan action plan circular 

संदर्भ :

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्र. -२०२६/प्र.क्र.२७६ (ई-१८८७००७) / एसडी-१, दिनांक १६.१०.२०२६.

२) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/सं.शा.अ./2026-27/2423268, दि. 14 ऑगस्ट, 2026. (मार्गदर्शक सूचना)

३) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Composite S.G. /ELE. & Sec. Rec./2026-27/2674, दि. 24 ऑगस्ट, 2026. ४) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Composite S.G.

/ELE. & Sec. Rec./2026-27/2683, दि. 25 ऑगस्ट, 2026.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रांच्या अनुषंगाने, राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना संयुक्त शाळा अनुदानांतर्गत स्वच्छता अॅक्शन प्लॅनसाठी मंजूर १०% अनुदानाचा निधी संदर्भीय पत्र क्र. ३ व ४ अन्वये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शासन परिपत्रक दिनांक १६.१०.२०२६ अन्वये राज्यातील शाळांमध्ये दिनांक १८ ऑक्टोबर ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

सन २०२६-२७ संयुक्त शाळा अनुदान मार्गदर्शक सूचनांनुसार आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित शाळांना आवश्यक सूचना देऊन, शासन परिपत्रकात नमूद केलेल्या अनुज्ञेय बाबींनुसार योग्य ती कार्यवाही करून सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होईल, याची दक्षता घ्यावी ही विनंती

Related posts:

Leave a Comment