उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील संचमान्यतेच्या अनुषंगाने शिक्षकांचे वेतन न थांबवण्याबाबत sanchamanyata circular 

उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील संचमान्यतेच्या अनुषंगाने शिक्षकांचे वेतन न थांबवण्याबाबत sanchamanyata circular

संदर्भ :

१. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे दि. २७.११.२०२६ चे निवेदन.

२. संचालनालयाचे दि. ०१.१०.२०२६ चे पत्र जा.क्र. शिसंमा/२०२५-२६/उमाशि-समायोजन/टि-८/ई-३१४८३६१

उपरोक्त विषयास अनुसरून दि.२७.११.२०२६ च्या संदर्भीय पत्रान्वये राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन / उच्च माध्यमिक स्तरावर संचमान्यता करीत असताना सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी मान्य पदापेक्षा वाढीव / अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबवण्यात येणार असल्याच्या धोरणामुळे, तसेच काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली असून, संबंधित शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.

संदर्भीय पत्र क्र.२ अन्वये राज्यामध्ये पदवीधर व शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणूक आदर्श आचार संहिता लागू असल्याने, शैक्षणिक सत्र २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया रद्द करणेबाबत कळविण्यात आले होते.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन / उच्च माध्यमिक विभागाच्या सन २०२६-२७ च्या संच मान्यतेचे कामकाज शंभर टक्के पुर्ण न झाल्याने तसेच प्रलंबित संचमान्यतामुळे शिक्षकांचे वेतन थांबवू नये. शाळांकडून आलेल्या वेतन बिलांबाबत अप्रूव्हलची कार्यवाही तात्काळ करावी तसेच देयके अदा करणे बाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी. कोणताही शिक्षक कर्मचारी वेतनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

तरी, आपल्या विभागांतर्गत सर्व संबंधित कार्यालयांना याबाबत योग्य त्या सूचना निर्गमित करून, शिक्षकांचे वेतन रोखले जाणार नाही याची खात्री करावी.

Related posts:

Leave a Comment