राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत shala patpadtalani circular
संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांकः लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम.३. दिनांक
०३.११.२०२५
२. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९. दि. ३१.०३.२०२६.
३. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८३०२०२, दि. ०६.०४.२०२६
४. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/ई-२४६३६८४/टि-८व/२०२६-२७, दि.०४.११.२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्र. २ व ३ अन्वये राज्यातील शाळांची पटपडताळणी ११ एप्रिल २०२६, १५ एप्रिल२०२६ व २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यात पटपडताळणीचा उपक्रम पार पडला.
संदर्भ क्र.३ अन्वये मागील पटपडताळणीमध्ये २५ ते ५० टक्के व मध्ये ५० टक्के पेक्षा जास्त अनुपस्थिती असणाऱ्या शाळांची तसेच ज्या शाळांची माहे एप्रिल मध्ये पटपडताळणी झालेली नाही अशा शाळांची पटपडताळणी करणेबाबत कळविले होते. संदर्भ क्र.३ अन्वये कळविण्यात आलेल्या शाळांची पटपडताळणी प्राधान्याने करण्यात यावी.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दि. २ डिसेंबर २०२६, ३ डिसेंबर २०२६ व ५ डिसेंबर २०२६ रोजी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षा आयोजित केलेली आहे. या दिनांकाला राज्यामध्ये इ.२ री ते इ.८ तसेच इ.९ वी व इ.११ वी ची पटपडताळणी नियोजित आहे. त्याअनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. इयत्ता २ री ते इयत्ता ८ वी च्या वर्गाच्या बाबतीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या दिनांकादिवशी म्हणजेच ०२/१२/२०२६, ०३/१२/२०२६ च ०५/१२/२०२६ रोजी पटपडताळणी करण्यात यावी.
२. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्याची आवश्यकता नाही. बोर्डाच्या परीक्षेमधील विद्यार्थी उपस्थिती ही ग्राह्य धरण्यात येईल.
३. इयत्ता ९ वी च्या वर्गाच्या बाबतीत पटपडताळणी उपरोक्त तारखांच्या (०२/१२/२०२६, ०३/१२/२०२६,०५/१२/२०२६) दिवशीच करावी. ४. तसेच इयत्ता ११ वीच्या वर्गाची पटपडताळणी ही दि. ०२/१२/२०२६, ०३/१२/२०२६,०५/१२/२०२६ रोजी आयोजित करण्यात याव. जेणेकरुन राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता २ री ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी ची पटपडताळणी उपरोक्त तीन दिवशी पुर्ण होईल.
५. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याचे अनुषंगाने स्टुडंट पोर्टलवर HM Login, Cluster Head Login, BEO Login EQ Login वर सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.. पटपडताळणीच्या अनुषंगाने शाळेस भेट देणारे पथक उपरोक्त लॉगीनचा वापर करुन हजर व गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करतील.
६. राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य, योजना), लेखाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक चे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इ. यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक म्हणून करावी व शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्यात यावी.
७. शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ) यांनी शाळा निहाय पटपडताळणीचे नियोजन आपल्या पातळीवरुन एकत्रितपणे करावे, अंमलबजावणी प्रभावीपणे होईल याकडे लक्ष द्यावे.











