क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी चारोळ्या krantijoti savitribai fule jayanti
विदयेवीना मती गेली, मतीविना निती गेली…
नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ अविदयेने केले
➖➖➖➖➖➖➖
हाती घेतली तुम्ही लेखणी नवचेतना आली जीवनी
शिक्षणाचा दीप लावला ज्ञानाचा प्रकाश पडे अंगणी
चौकटीतले होते जगणे आज भरारी विद्येच्या प्रांगणी
पंख दिले सावित्रीमाईनी उडण्या विशाल नभांगणी
➖➖➖➖➖➖➖
अनाथांसाठी हृदयी माया साधी सरळ होती राहणी
स्त्री शिक्षणाचा ध्यास होता स्वप्न होते एकच मनी
➖➖➖➖➖➖➖
तेज कार्याचे झळके तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक पानी
क्रांतीज्योती सावित्रीमाई’ हृदयी अजरामर तुमची कहाणी
➖➖➖➖➖➖➖
तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे…
तू कल्पना, तू सुनिता, आकाशात तुझी झेप आहे…
➖➖➖➖➖➖➖➖➖
कित्येक रुपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू…
प्राणवायु कुटूंबा देई तीच मंगल तुळस तू…
➖➖➖➖➖➖➖➖
चूल आणि मूल सोडून, हाती धरायला शिकवली पाटी…
वंदन त्या माऊलीला, जी झिजली आमच्यासाठी….
➖➖➖➖➖➖➖➖
अंधार दूर सारून, ज्ञानाचा दीप लावला…
सावित्रीच्या लेकींनी आज प्रगतीचा टप्पा गाठला
➖➖➖➖➖➖➖
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू..!
➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे…
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिज लाभू दे…
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
➖➖➖➖➖➖➖➖➖
मागे वळून पाहू नकोस, परिवर्तनाच्या वाटेवर, टाक पाऊले ! तू तर आहेस आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले !!
➖➖➖➖➖➖➖➖
नभी झेपावणारी तू पक्षिणी…
सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी…
प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी…
शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी…
➖➖➖➖➖➖➖➖➖
शिक्षणाच्या स्वर्गाचे, जिने उघडले दार …..
तीच सावित्री आज, जगाची शिलेदार…. ”
➖➖➖➖➖➖➖➖
स्त्रियांच्या शिक्षणाची, खरी, कैवारी…
सावित्री तुझ्यामुळे शिकेल आज प्रत्येक नारी
➖➖➖➖➖➖➖
समाजाला जिने दिली, ज्ञानाची सावली ….
धन्य ती क्रांतीज्योति सावित्री माऊली….
➖➖➖➖➖➖➖
प्रथम शाळेची घंटा…. अहो तिनेच वाजवली !
साऱ्या भारतामध्ये हो, किर्ती तिनेच गाजवली !
➖➖➖➖➖➖➖➖
पहिली उघडली मुलींची शाळा….
तिने जागृत केला समाज सगळा !
दिन – दिनांची हो…. झाली ती माऊली !
साऱ्या भारतामध्ये हो… किर्ती तिनेच गाजवली
➖➖➖➖➖➖➖
ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया…
कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया…
कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते,
सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते”
➖➖➖➖➖➖➖➖
स्त्री म्हणजे एक वाट
अशक्य ते शक्य करून दाखविणारी
अन्यायाला न्याय मिळवून देणारी
अन् स्वसुखाचा त्याग करून
दुःखांना कवटाळणारी









