अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविणेबाबतची कार्यपध्दती व कालबध्द कार्यक्रम janma mrutyu nond paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अवैध विलंबित जन्म-मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविणेबाबतची कार्यपध्दती व कालबध्द कार्यक्रम janma mrutyu nond paripatrak 

वाचा :-

शासन निर्णय सा.आ.वि. क्रमांक जमृनों २५२५/ ई.ऑ.११५३१४३/ प्र.क्र.२२/ कु.क. २., दि. १६.०९.२०२५.

शासन शुध्दीपत्रक :-

वाचा येथील शासन निर्णयातील अ) येथील परिच्छेद क्र. २ मधील शेवटच्या ओळीतील “या मुदतीत प्रमाणपत्र जमा न केल्यास पोलीसांकडून प्रमाणपत्र जप्त करण्यात येईल” या ऐवजी “या मुदतीत प्रमाणपत्र जमा न केल्यास पोलीस यंत्रणेच्या मदतीने प्रमाणपत्र जप्त करण्यात येईल” तर परिच्छेद क्र. ४ “स्थानिक पोलिस स्टेशन प्रभारी यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन मूळ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र जप्त करुन घ्यावे” या ऐवजी “महसूल यंत्रणेने पोलिस यंत्रणेच्या मदतीने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन मूळ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र जप्त करुन घ्यावे” असे वाचावे. तसेच परिच्छेद क्र. ५ व ६ मध्ये “पोलिस स्टेशन प्रभारी यांचे कडून / पोलिसांकडून” या ऐवजी “पोलिस स्टेशन प्रभारी / पोलिसांच्या मदतीने” असे वाचावे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक शासनाच्या महसूल व वन विभाग आणि गृहविभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. हे शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा सांकेतांक २०२६०१०६१६१०३०९२१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment