स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणेबाबत प्रस्ताव sports competition circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शालेय कला व क्रिडा स्पर्धा आयोजित करणेबाबत प्रस्ताव sports competition circular 

संदर्भ:- १. मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे अध्यक्षतेखाली

दि.९/५/२०२६ रोजीच्या बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या सूचना

२. संचालनालयाचे पत्र क्र प्राशिसं/टे-३०१/२०२६/दि.८/९/२०२६

३. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र. १/२५२७०४४/२०२६ /दि.१७/१०/२०२६

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP २०२०) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित असून शिक्षणामध्ये कला आणि क्रीडा या विषयांना केंद्रस्थानी ठेवण्याची शिफारस करते. शालेय स्तरावर अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रम यांच्यामधील दरी नष्ट करून कला आणि क्रीडा यांना मुख्य प्रवाहातील विषयांच्या बरोबरीने स्थान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना ओळखणे, त्यांना, प्रोत्साहन देणे आणि स्थानिक संस्कृतीशी त्यांचे नाते घट्ट करणे ही काळाची गरज आहे. शालेय वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी. त्यांच्या मधील कौशल्ये विकसित व्हावीत आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण होऊन स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेता कला व क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आवश्यक आहे. याचबरोबर शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रिडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत नियमितपणे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात

येतात. याचबरोबर काही जिल्हा परिषदामार्फत जिल्हा परिषद निधीमधून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

केंद्र सरकारच्या PAB (Project Approval Board) द्वारे ‘खेळ-उड्डाण उत्सव २०२६-२७’ (KHEL-UDAAN UTSAV 2026-27) एक उपक्रम मंजूर केला आहे.

यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी प्राथमिक करिता रू.२२.४६९ कोटी आवर्ती तरतूद मंजूर आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळांमधील विदयार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणेच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून केंद्रस्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावर शालेय कला व क्रिडास्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

याबाबत आवश्यक खर्च मंजूर तरतूदीनुसार महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई मार्फत समग्र शिक्षा अंतर्गत अंतर्गत Sports and co-curricular activities and competition या उपक्रमासाठी मंजूर असणा-या तरतुदीच्या मर्यादेत निधी उपलब्धतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यांनी जिल्हयासाठी व प्रशासन अधिकारी महानगर पालिका (पाच मनपा) यांनी मनपासाठी सोबत जोडलेल्या निकषानुसार कला व क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या खर्चाची मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर करावी.

स्पर्धा पूर्ण झाल्यावर अहवाल संचालनालयास व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयाकडे सादर करावा. सोबत – मार्गदर्शक सूचना

Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 30-10-2026 16:09:35

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-१

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त (शिक्षण), आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

शालेय कला व क्रीडा स्पर्धा (२०२६-२७)

१. स्पर्धा गट, इयत्ता व वयोगट निश्चिती :

विद्यार्थ्यांची इयत्ता व वयोगटानुसार खालीलप्रमाणे दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात येत आहे.

१.१ प्राथमिक गट (Primary): पात्रताः इयत्ता ३ री ते ५ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

१.२ उच्च प्राथमिक गट (Upper Primary): पात्रताः इयत्ता ६ वी ते ८ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

सदरची स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळामधील विदयार्थ्यांसाठी राहील. संबंधित जिल्हा परिषद व महानगरपालिका यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या वैयक्तिक निधीतून (जि.प.सेस मधून) इतर कला क्रीडा स्पर्धा समाविष्ट करता येतील.

२. कला स्पर्धा:-

विद्यार्थ्याच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी शालेय स्तरावर कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, मानवी मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख होऊन त्याबद्दल सार्थ अभिमान निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यासाठी खालीलप्रमाणे वैयक्तिक स्पर्धा व सांघिक स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे.

२.१ प्राथमिक गट (Primary):

पात्रताः इयत्ता ३ री ते ५ वी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी.

३. क्रीडा स्पर्धाः

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून, या स्पर्धा केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढवत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि निकोप स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करतात. खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विकास होतोच, शिवाय मानसिक एकाग्रता आणि हार-जीत स्वीकारण्याची प्रगल्भता वाढून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला विकास होतो, यासाठी स्पर्धा आयोजनात वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.

४. स्पर्धांचे वेळापत्रक

विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन खालील निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करण्यात यावे. विहित वेळेत स्पर्धा पार पाडण्यासाठी खालील वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

५. स्पर्धा आयोजन

५.१ केंद्र पातळीवरील स्पर्धां प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळामधील विदयार्थ्यांसाठी केंद्र करावे. शासकीय व स्थानिक स्वराज्य पातळीवरील स्पर्धांचे आयोजन

५.२ तालुका पातळीवरील स्पर्धा : एकूण ४०८ (BRC+URC) ग्रामीण भागात प्रत्येक तालुका (BRC) व शहरी भागात (URC) स्तरावर स्पर्धा

> नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील विद्यार्थी संबंधित तालुक्यात तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी

होतील.

५.३ जिल्हा पातळीवरील रचना: एकूण ३६+५= ४१

> राज्यातील एकूण ३६ जिल्हे (३४ ग्रामीण जिल्हे मुंबई शहर व मुंबई उपनगर नागरी जिल्हे) यात समाविष्ट आहेत.

▶ ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका ५ महानगरपालिका (पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक आणि नागपूर) यांना जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजनासाठी स्वतंत्रपणे जिल्हा घटक समजण्यात यावे.

याव्यतिरिक्त इतर महानगरपालिका अंतर्गत समाविष्ट URC यांना तालुका घटक समजण्यात येईल. त्यानुसार त्या URC स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होतील.

मुंबईयांचैत्र १/२५२७०४४/२०२६/दि. १७/१०/२०२८

1/2217030/2026

६. अंमलबजावणी जबाबदारी

सदर उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्षेत्रानिहाय अंमलबजावणीची जबाबदारी सोपवण्यात येत आहे.

६.१ केंद्र स्तरः समूह साधन केंद्र समन्वयक

६.२ तालुका / URC स्तरः गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी

६.३ जिल्हा / मनपा स्तरः शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी

६.४ क्रीडा स्पर्धेशी संबधित नियम क्रीडा व युवक संचालनालय यांचेद्वारे निश्चित केल्या प्रमाणे राहतील.

७. खर्च निकष व तरतूद

खालील निकषाप्रमाणे आवश्यक निधीची मागणी शिक्षणाधिकारी (प्राथ) व प्रशासन अधिकारी महानगरपालिका (५ मनपा) यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे करावी.

७ (अ) -कला स्पर्धा

१) प्राथमिक गट- इयत्ता ३ ते ५ वी

स्पर्धा प्रकार-वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, समूहगीतस्पर्धा, समूहनृत्य स्पर्धा (एकूण ६

२. उच्च प्राथमिक गट- इयत्ता ६ ते ८ वी

स्पर्धा प्रकार- धावणे १०० मी. (मुले-मुली), धावणे २०० मी. (मुले-मुली), उंच उडी (मुले-मुली), लांब उडी (मुले-मुली), रिले ४x१०० (मुले-मुली), बुध्दीबळ (मुले-मुली), गोळा फेक (मुले-मुली). थाळी फेक (मुले-मुली), खो-खो (मुले-मुली, कबड्डी (मुले-मुली) (एकूण १० स्पर्धा, मुले व मुली गटासाठी प्रत्येकी ३० क्रमांक, प्रथम, व्दितीय, तृतीय याप्रमाणे एकूण ६० बक्षीसे) यामध्ये प्रमाणपत्र व मेडल/ट्रॉफी देण्यात यावे.

जिल्हा स्तरावर स्पर्धेपूर्वी तज्ज्ञ मार्गदर्शकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. या कार्यशाळेत निमंत्रित तज्ज्ञ विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे बारकावे, कला गुणांचा विकास आणि स्पर्धात्मक मानसिकतेबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करतील. सदरचा खर्च स्पर्धा आयोजन तसेच जिल्हा स्तरावर याबाबत कार्यशाळा आयोजन असा एकत्रित आहे.

७(ड)- टी शर्ट व कॅप अपेक्षित खर्च (जिल्हास्तरावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थी)

जिल्हास्तरावर/मनपास्तरावर (५ मनपा) स्पर्धेत सहभागी विद्यार्थी यांना टी शर्ट व कॅप देण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यातील/मनपातील तालुका/URC संख्येनुसार प्रति तालुका/URC १८५ विद्यार्थी याप्रमाणे रू. ३००/- प्रति विद्यार्थी खर्च मंजूर आहे.

Related posts:

Leave a Comment