सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका जाहीर दिनांक ३ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत सूचना/ हरकतींसाठी लिंक उपलब्ध state eligibility test answer key declared 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका जाहीर दिनांक ३ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत सूचना/ हरकतींसाठी लिंक उपलब्ध state eligibility test answer key declared 

राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ४१ वी सेट परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १८ शहरातील २९४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) दिनांक ३१/१०/२०२६ रोजी जाहीर होत असून प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना/हरकती अथवा दिलेल्या उत्तरास हरकत घ्यायची असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर असलेला ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुराव्यासह व प्रत्येक प्रश्नास रू. २००/- (Non-refundable) शुल्कासह सादर करावयाचा आहे. प्रश्नपत्रिका अथवा उत्तरतालिकेबाबतची हरकत वा तकार करताना आपली विवक्षित प्रश्नपत्रिका व तिचा सेट (A/B/C/D) निश्चीत करावा.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रश्नपत्रिका अथवा प्राथमिक उत्तरतालिकेबाबत आपल्या काही हरकती/सूचना असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत, सदर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, व्यक्तीशः किंवा टपालामार्फत सेट विभागात स्विकारले जाणार नाहीत.

सदर प्रश्नपत्रिका/उत्तरतालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक ३१/१०/२०२६ पासून दिनांक ०३/११/२०२६ रात्री ११.५९.५९ पर्यंत उपलब्ध आहे. दिनांक ०३/११/२०२६ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या हरकती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम उत्तरतालिका निकालाबरोबर जाहीर करण्यात येईल.

Related posts:

Leave a Comment