दिनांक १ नोव्हेबर २००५ पुर्वीनियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार-यांचे प्रस्तावार तातडीने कार्यवाही करण्याचे दिनांक १८.०९.२०२५ रोजी मा.शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर येथिल बैठकीतील निर्णयनुसार आदेशित करण्याबाबत shikshak shikshakittar anudan prastav
नागपूर जिल्यातील सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेच्या सर्व मुख्याध्यापक यांना सुचित करण्यात येते की, दिनांक १ नोव्हेंबर २००५ पुर्वीनियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार-यांची मा. उच्च न्यायालय खंडपीठ, मुबई रिट याचिका क्रमांक २३४५/२०१४ मधील निर्णय दिनांक २७.०२.२०२५ नुसार दिनांक १ नोव्हेबर २००५ पुर्वी नियुक्त व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत संदर्भिय पत्रानुसार कळविण्यात आलेले असुन सदर कर्मचारी यांची माहिती तात्काळ या कार्यालयात दिनांक २०.०९.२०२५ ला सादर करावी सदर माहिती देण्यास कोणतेही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार-यांची माहिती खालील प्रपत्रामध्ये भरुन न दिल्यास व पुढील होणा-या लाभापासुन वर्चित राहिल्या यांची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील. (संबधित शिक्षकांचे आवश्यक कागदपत्रे जोडावे)











