जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा jilha parishad karmachari jilha antargat badli
वाचा :-
शासन निर्णय क्र. जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४
शासन पूरक पत्रः-
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे धोरण ग्राम विकास विभागाच्या वाचा येथील दि. १५ मे, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहे.
सदर शासन निर्णयातील प्रकरण-१ मधील अनु.क्र. ४(२) (५) येथे नमुद “आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी” या मजकुराच्या अगोदर “माजी सैनिक तसेच” तसेच प्रकरण -१ मधील अनु.क्र. ४ (४) (६) येथे नमुद आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा” या मजकुराच्या अगोदर “माजी सैनिक तसेच” असा मजकुर समाविष्ट करण्यात येत आहे.
सदर शासन पूरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०९०९१५५३२४३६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,











