महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांचे अंतर्गत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना मधील लाभार्थी निवड समितीची अटी रद्द करण्याबाबत educational loan interest partava yojana
महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: इमाव २०२६/प्र.क्र.१०९/महामंडळे कस्तुरी इमारत, चर्चगेट, मुंबई-४०००३२
दिनांक : २१ सप्टेंबर, २०२६
वाचा : इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. इमाव-20२१/प्र.क्र.२३/महामंडळे, दि.०६.१२.२०२१
शासन शुध्दीपत्रक
वाचा येथे नमूद शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांचेमार्फत राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता इतर मागासवर्ग प्रवगातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च व शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयातील शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यासाठीच्या कार्यपध्दतीमधील अट क्र.०३ खालीलप्रमाणे आहे.
“प्राप्त प्रस्तावास जिल्हा लाभार्थी निवड समितीची मान्यता घेवून जिल्हा व्यवस्थापक सदर प्रस्ताव मुख्यालयास मंजूरीकरीता सादर करतील”.
उपरोक्त शासन निर्णयातील कार्यपध्दतीमधील अट क्र. ३ याद्वारे रद्द करण्यात येत असुन, यापुढे जिल्हा व्यवस्थापक सदर प्रस्ताव थेट मुख्यालयास मंजूरीकरीता सादर करतील.
२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२६०९२११५५१२२७२३४ असा आहे. सदर शासन शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,











