इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online addmission
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१.
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७
जाहीर प्रकटन
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९६४९ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत एकूण १३,७६,४४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दुस-या फेरी करीता एकूण नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५,९७,८५२ विद्यार्थ्यांनी त्यांचे पसंतीक्रम नोंदवून प्रवेश अर्ज लॉक केलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांपैकी २,६२,७७२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. दिनांक १३/०६/२०२६ रोजी ३२,४७६ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत.
यामध्ये कॅपमध्ये एकूण २२,७१७ विद्यार्थ्यांनी प्रवेश झालेले आहेत. तसेच कोट्यामध्ये (ईन-हाऊस कोटा ( व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा) ९७५९ इतके प्रवेश झालेले आहेत. त्यांचा विभागनिहाय तपशिल खालील प्रमाणे
यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कालावधी हा दिनांक १३/०६/२०२६ ते १६/०६/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत आहे.
विद्यार्थ्यांनी एस.एम.एस. संदेश वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आपल्या लॉगीनमध्ये आपल्याला कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले हे पाहूनच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी जावे.
विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्द देण्यात यावी. ही विनंती.










