जे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी प्रवेशित होते व स्वाधार योजनेचा लाभ घेत होते अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह योजनेचा लाभ घेणेसाठी संधी उपलब्ध करुन देणेबाबत swadhar yojana paripatrak
संदर्भ :-
१. आयुक्तालयाचे परिपत्रक क्र. १९६२ दिनांक २५.०५.२०२६.
२. आयुक्तालयाचे पत्र क्र. २४६५ दिनांक १५.०७.२०२६.
३. आयुक्तालयाचे पत्र क्र. २५७८ दिनांक २८.०७.२०२६.
४. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती, महा राज्य यांचे निवेदन दिनांक ०५.०८.२०२६.
संदर्भ क्र.१ व २ च्या परिपत्रकान्वये शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशाचे अर्ज स्वीकारुन प्रवेश देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे/ येत आहे. मात्र जे विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात प्रवेशित होते व स्वाधार योजनेचा लाभ घेतला होता. अशा विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी वसतिगृह प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली नाही. कारण ते तांत्रिक दृष्टया स्वाधार योजनेचा लाभ घेत होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी महाआयटी टीम यांना पूर्वसुचना देण्यात आलेली होती. तथापि पोर्टलवर तांत्रिक बाबींची पुर्तता न झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारता आले नाही.
याबाबत आपण अशा विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन त्यांची छाननी व तपासणी करुन त्यांना गुणवत्तेनुसार वसतिगृह प्रवेश देण्याची कार्यवाही तात्काळ करावी. शासकीय वसतिगृह प्रवेशानंतर या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टलमध्ये समायोजन करुन घेण्याची कार्यवाही करण्यात येईल.









