शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान दोन शाळांची यशोगाथा मार्गदर्शक मुद्यांनुसार सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत shalanchi yashogatha paripatrak
संदर्भ – 1.NCSL, निपा, नवी दिल्ली यांचे पत्र दि.04 ऑगस्ट, 2026. 2. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.मिपा/SLA/2026-27/804 दि.10/09/2026.
उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील उत्तम शाळांच्या यशोगाथा (Case Study) मिपा संस्था, छत्रपती संभाजीनगर मार्फत NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठविल्या जातात व NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल https://ncsl.niepa.ac.in/ मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या वेबपेज
https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra.php वर प्रकाशित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. 1 नुसार सन 2026-27 मध्ये शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वातून शिक्षकांच्या सहकार्याने शाळांमध्ये अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, अशा महाराष्ट्रातील शाळांच्या यशोगाथा NCSL, निपा, नवी दिल्ली येथे पाठवावयाच्या आहेत.
संदर्भ क्र.2 नुसार आपल्या जिल्ह्यातील शालेय शिक्षणातील विविध क्षेत्राअंतर्गत सकारात्मक बदल झालेल्या किमान 02 ज्यात शासकीय/जिल्हा परिषद/नगर परिषद/महानगरपालिका/कटक मंडळे (स्थानिक स्वराज्य संस्था) खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या यशोगाथा सोबतच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन या कार्यालयाच्या miepasla2019@gmail.com या ईमेलवर दि.30/09/2026 पर्यंत Google Input मध्ये Arial Unicode MS या Font मध्ये टंकलिखित करुन Word व PDF स्वरुपात पाठविण्यात बाबत कळविण्यात आले होते. परंतू अनेक जिल्ह्यांच्या मागणीनुसार शाळा यशोगाथा माहिती पाठविण्यासाठी दि.23/10/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सोबत – 1. यशोगाथा लेखनासाठी क्षेत्रांची / विषयांची यादी
2. यशोगाथा लेखन – मार्गदर्शक सूचना, समाविष्ट करावयाचे मुद्दे व Format.











