“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत teacher eligibility test paripatrak
उमेदवारांसाठी सूचना
“शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५” नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठीच्या रूपांतरित फेरीतील शिफारशीबाबत.
१. दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०७/२०२६ या दरम्यान मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
२. दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.
३. मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात एकूण १,४६,६५० उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.
४. यापूर्वी मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील टप्पा-१ मधील नियमित फेरीतील १३,११९ रिक्त जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २७/०८/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
५. आता मुलाखतीशिवाय या निवड प्रकारात स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील समांतर आरक्षणाच्या रिक्त राहिलेल्या जागांसाठी निवडीसाठीची टप्पा-१ मधील रूपांतरित फेरीतील ४,३९० रिक्त जागांवर ऑनलाईन शिफारस होत असलेली उमेदवारांची रूपांतरित फेरी (Converted Round) सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
६. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.
७. उमेदवारांची निवड होण्यासाठी आरक्षण, समांतर आरक्षणासह यातील कटऑफ व विषयाचा कटऑफ या दोन्ही मध्ये कटऑफ पेक्षा अधिक असल्यास उमेदवाराची शिफारस होते, दोन्ही कोणत्याही एका प्रकारात कटऑफ पेक्षा कमी गुण असल्यास निवडीसाठी विचार होत नाही. यासाठी त्या त्या व्यवस्थापनाच्या
सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण व विषयाचा कटऑफ दिलेला आहे त्यानुसार आपल्या निवडीबाबत खात्री करता येईल.
८. उमेदवारांच्या निवडीबाबतची स्थिती उमेदवारांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात आली आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
९. मुलाखतीसह निवडप्रकारातील यादी यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
१०. प्राप्त जाहिरातींपैकी प्रशासकीय कारणास्तव मनपा अमरावती यांची सुधारित पदे विचारात घेण्यात आली आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
११. रूपांतरित फेरीतील सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये दर्शविण्यात आलेली पदे विचारात घेऊन उमेदवारांच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.
१२. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म (Application Form) या मेनू अंतर्गत अप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-१) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे. त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईज स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.
१३. तसेच View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस न झालेल्या लॉक केलेल्या सर्व प्राधान्यक्रमावरील Subject Cutoff व Roster Cutoff (विषय व आरक्षणाचा कटऑफ) पाहता येणार आहे. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर Download या मेनूमध्ये देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना या सुविधेचा वापर करून आपल्या निवडीबाबत पडताळणी करता येईल.
१४. नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील पुढील कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येत आहेत.
१५. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल, याची उमेदवारांनी नोंद
घ्यावी. तसेच उमेदवार पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
१६. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
१७. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर “तक्रार निवारण व दुरुस्ती समिती” स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यांसहित विहित नमुन्यात अर्ज सादर करता येईल.
१८. उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील तक्रारींबाबत वर दिलेल्या ई-मेल शिवाय अन्य मार्गाने आलेले अर्ज/निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१९. उमेदवारांनी आपले तक्रार अर्ज दिनांक २७/०९/२०२६ अखेर पर्यंत edupavitra2025grcc@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत, विहित कालावधीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
२०. उमेदवारांना अन्य काही अडचणी edupavitra२०२५@gmail.com या email वर संपर्क साधता येईल. आल्यास
२१.निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.
(सचिन्द्रप्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य
पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Dashboard/DashboardCandidate.aspx










