४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ ह्या परीक्षा दिनांकातील बदलाबाबत शुध्दीपत्रक अधिसूचना state eligibility test shuddhipatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ ह्या परीक्षा दिनांकातील बदलाबाबत शुध्दीपत्रक अधिसूचना state eligibility test shuddhipatrak 

विषयः ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ ह्या परीक्षा दिनांकातील बदलाबाबत.

१. ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची सूचना यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती.

२. तथापि, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांचे अलीकडे वेळापत्रक प्राप्त झाले आहे. तसेच, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने परीक्षार्थीना प्रवासविषयक तसेच परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या व्यावहारिक अडचणी उद्भवू शकतात. या दोहोंच्या अनुषंगाने या कार्यालयास प्राप्त झालेल्या निवेदनांचा सर्वंकष विचार करण्यात आला.

३. सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून, परीक्षार्थीच्या हिताच्या तसेच परीक्षा आयोजनातील सोयीच्या दृष्टीने, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आलेली ४१ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ आता दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येईल, असे याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे.

४. सदर अधिसूचना सर्व संबंधित परीक्षार्थी, परीक्षा संपर्क प्रमुख, तसेच संबंधित सर्व यंत्रणा यांना लागू आहे. सर्व संबंधितांनी याची कृपया नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment