इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online addmission
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१.
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७
जाहीर प्रकटन
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९५९४ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
दिनांक ०६/०६/२०२६ रोजी पासून नियमित दुस-या फेरीतील विद्यार्थी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नविन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग-१ मधील दुरुस्ती आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) दिनांक ०९/०६/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा. पर्यंत भरु शकतात. या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज लॉक करणे अनिवार्य आहे. आज दिनांक ०७/०६/२०२६ रोजी ६८,२५८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्द देण्यात यावी. ही विनंती.










