राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी प्रस्ताव मागविणेबाबत shaley netrutva parishad prastav 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील शासकीय व अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून राष्ट्रीय शालेय नेतृत्व परिषदेसाठी प्रस्ताव मागविणेबाबत shaley netrutva parishad prastav 

संदर्भ : निपा, नवी दिल्ली यांचे पत्र NIEPA-NCSL/October/21/2026-2027 दि. 12/10/2026

उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार कळविण्यात येते की, राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था निपा येथे स्थापन करण्यात आले आहे. शालेय नेतृत्वासंदर्भातील साहित्य विकसन आणि क्षमता विकास कार्यक्रम राबविणे ही या केंद्राची प्रमुख जबाबदारी आहे.

शालेय शिक्षणात काम करणाऱ्या शालेय नेतृत्वाची दखल घेण्यासाठी NCSL निपा मार्फत शालेय नेतृत्वाचा उत्सव Celebrating School Leadership CSL हा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा आणि अनुदानित शाळा यांच्या मुख्याध्यापकांकडून त्यांच्या कार्यातून शाळांची प्रगती, यशोगाथा सादरीकरण मागविण्यात येत आहे. यात पूर्वप्राथमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आपली सादरीकरणे पाठवू शकतात.

सादरीकरणाचे स्वरूप –

मुख्याध्यापक शाळेची यशोगाथा माहिती व छायाचित्रे / व्हिडिओ स्वरुपात पाठवू शकतात.

सदर माहितीची भाषा इंग्रजी/हिंदी/भारतीय भाषा निवडता येईल,

यशोगाथा पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून nesl.csl@niepa.ac.in या मेलवर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी सोबत जोडलेल्या निपा, नवी दिल्ली पत्राचे अवलोकन करावे.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment