राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव (National Science Drama Festival) २०२६-२७ चे आयोजनाबाबत
संदर्भ:- शिक्षणाधिकारी व विभागीय समन्वयक, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांचे पत्र क्र.
NSCM-१७०२७/२२/२०२६/५५६ दिनांक १४/०७/२०२६.
उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2026 या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई यांचे कडून मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना आपले स्तरावरून निर्गमित करावे. या विज्ञान विषयक नाट्य स्पर्धेत जास्तीत जास्त शाळा सहभाग घेतील याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी.
उपरोक्त विषयांवर राष्ट्रीय संग्रहालय परिषद । भारत सरकार) नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई आणि शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ मध्ये विज्ञान नाट्योत्सव विविध स्तरावर आयोजित करायचे निर्देश आहेत.
उपक्रमाचा हेतूः-विज्ञान नाट्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि जनसामान्य यांना वैज्ञानिक माहिती, घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने देता यावी तसेच विज्ञान नाट्यातून विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मनोरंजना सोबत समाज प्रबोधन , व्हावे या हेतूने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.
उपक्रम आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचनाः- २०२६-२७ या वर्षाकरिता विज्ञान नाट्योत्सवाचा मुख्यविषय व उपविषय पुढील प्रमाणे आहेत.
मुख्य विषयः- Science and Society (विज्ञान आणि समाज) हा असून त्या अंतर्गत पुढील प्रमाणे चार उपविषय दिलेले आहेत.
Artificial Intelligence: Friends, Tool or Threat?: कृत्रिम बुद्धिमत्ताः मित्र, साधन की धोका?
२. EV:Way Forward इलेक्ट्रिक वाहनेः पुढचा मार्ग
3. Interstellar Habitats: आंतरतारकीय अधिवास/अंतराळातील मानवी वस्ती
४. Restoring Oceans-Preserving Generations: महासागरांचे पुनरुज्जीवन-पिढ्यांचे जतन
उपरोक्त विषय व उपविषयानुसार, पश्चिम भारत झोनल पातळीवरील विज्ञान नाट्योत्सव नोव्हेंबर च्या अंतिम आठवड्यात नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई येथे घेण्यात येणार आहे तर राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन ६ जानेवारी २०२७ रोजी सायन्स सिटी, कोलकत्ता येथे करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील विज्ञान नाट्यस्पर्धेची जबाबदारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे राहील व त्यांच्या नियंत्रणाखाली विज्ञान पर्यवेक्षक व क्षेत्रीय अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर सुद्धा विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होणे अपेक्षित आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून, विभागस्तरावर ०९ विज्ञान नाट्य चमू निवडण्यात यावा. विभागस्तरावरील विज्ञान नाट्योत्सवाची जबाबदारी मा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कडे राहील. त्यांचे नियंत्रणाखाली संबंधित अधिकारी याबाबत आवश्यक कार्यवाही करतील. विभागस्तरावरून प्रथम क्रमांक आलेल्या केवळ एक विज्ञान नाट्य चमूला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल. राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) नागपूर तर्फे करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या दरम्यान करण्यात येईल. या स्पर्धेची निश्चित तारीख व स्थळ आपणास यथाशीघ्र कळविण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या एक विज्ञान नाट्य चमूची माहिती विहित सांख्यिकीय प्रपत्रासह आपण संबंधित मा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावे व एक प्रत या कार्यालयास पाठवावी.
तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धेसाठी नियम व अटी-
१. कोण भाग घेऊ शकतो शासनमान्य शाळेत नियमित शिकणारे (इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे) विद्यार्थी,
२. विज्ञान नाट्य पूर्ण करण्यासाठी दिलेला कालावधी कमाल अर्धा तास (३० मिनिटे).
३. भाषा व विषयः-विज्ञान नाट्य हे हिंदी, मराठी किंवा इंग्रजी किंवा इतर शासनमान्य भाषेतून सादर करता येईल, विज्ञान नाट्य
हे दिलेल्या विषय/उपविषय यावरच आधारित असणे आवश्यक आहे.
४. विज्ञान नाट्याच्या एका चमूत जास्तीत-जास्त आठ पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. विज्ञानाच्या एका
‘चमूत विद्यार्थी/विद्यार्थिनी कमाल संख्या आठ याव्यतिरिक्त मार्गदर्शक शिक्षक, संगीतकार, गायक, वादक, नेपथ्यकार, मदतनीस इत्यादींचा समावेश, होईल. परंतु प्रत्यक्ष मंचावर विज्ञान नाट्य सादर करताना सादर कर्त विद्यार्थी/विद्यार्थिनी हे जास्तीत जास्त आठ या संख्येत असतील. याव्यतिरिक्त मंचावरील नाट्याच्या दृष्टीने कोणाचाही प्रवेश नियमबाह्य समजण्यात येईल.
पडद्यामागील कलाकारांच्या/मदतनीसांच्या समावेशाबाबत नाट्य चमूचे अधिकार असतील,
५. पंच (Judges)-विज्ञान नाट्याचे परीक्षण करताना तीन पंच असणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन, विद्यापीठ किंवा संशोधन विभाग यासारख्या शैक्षणिक संस्था मधील विज्ञान तसेच कला, नाट्य, संगीत विषयाचे जाणकार (तज्ज्ञ) मान्यवर व्यक्तींना शक्यतोवर पंचांचे कार्य सोपवावे. सहभागी शाळेतील शिक्षकांची पंच म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये. या विज्ञान नाट्य स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील.
६. कोणत्याही परिस्थितीत दोन नात्यांना सारखे गुणदान होणार नाही याची पंचांनी दक्षता घ्यावी, अशावेळी सारखे गुणदान झाल्यास पुनर्मूल्यांकन करून पंचांनी अंतिम निर्णय द्यावा. पंचांचा निर्णय सर्वांकरिता मान्य व बंधनकारक राहील.
७. विज्ञान नाट्य मूल्यमापनाचे निकष एकूण गुण १००
८. विज्ञान नाटघाच्या दर्जेदार सादरीकरण करिता पोस्टर्स, बॅनर्स, दृकश्रवण माध्यम, पाश्र्श्वभूमी (backdrops) इत्यादींचा वापर नाट्य चमूने (स्वतः) करणे अपेक्षित आहे.
९. नाट्य चमूने नाट्य सादरीकरणापूर्वी नाटयाची पटकथा (Script) परीक्षकांना किमान दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. इंग्रजी किंवा हिंदी ऐवजी इतर भाषेत नाट्य असल्यास, त्या नाट्याची अस्सल (Authentic) इंग्रजी किंवा हिंदी भाषांतरांची स्क्रिप्ट नाट्य सुरू होण्यापूर्वी परीक्षकांना द्यावी लागेल.
१०. विभाग स्तरीय नाट्य स्पर्धेकरिता आर्थिक तरतूद पुढील प्रमाणे प्रस्तावित आहे-
१. परीक्षक मानधनः (३ परीक्षक रुपये २०००/-) रुपये ६०००/-
२. बक्षिसेः-अ) प्रथम- रुपये ३०००/-
ब) द्वितीय- रुपये २०००/
क) तृतीय- रुपये १५००/-
३. सादिलवार खर्चः-(ध्वनी, प्रकाश, प्रमाणपत्रे छपाई इत्यादी)- रुपये १५०००/-
असा एकूण खर्च २७५००/- इतका खर्च एका विभागस्तराकरिता मंजूर राहील. राज्यस्तरीय विज्ञाम नाट्य स्पर्धाः राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या नाट्य चमूतील
र्कमाल ८ (आठ) विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता (निवास व भोजन खर्च वजा करून) एसटी किंवा रेल्वे द्वितीय श्रेणी या संस्थेमार्फत अदा करण्यात येईल. शिक्षकांचा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता शाळेच्या आस्थापनेतून काढावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले प्रवास तिकीट व बैंक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या तारखाप्रमाणे तसेच उपरोक्त दिशानिर्देशाप्रमाणे स्तरनिहाय विज्ञान नाट्य स्पर्धाचे आयोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करावी.
विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा एक उपचार म्हणून पार पाडल्या जात असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे या स्पर्धा मागे वैज्ञानिक उद्देश पूर्णतः सफल होत नाही. त्यासाठी सर्व शिक्षणाधिकारी यांनी या उपक्रमाकडे जातीने लक्ष घालून तालुकास्तरावरील तसेच जिल्हास्तरावरील नियोजन प्रभावीरीत्या होईल, याची दक्षता घ्यावी, तालुकास्तर स्पर्धेकरिता माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हास्तर स्पर्धेकरिता मा. विभागीय शिक्षण उपसंचालक हे सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्य पार पाडतील.









