उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च- २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखांबाबत hsc exam online application date
संदर्भ – रा.मं/ले. पे०६/परीक्षा शुल्क २०२५-२६/१८६६, दि.०५/०५/२०२६ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणालीमधील PFN-ID वरून न घेता २०२५-२६ ला प्रवेशित इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहे. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जावून आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे.
सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील
सर्व उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उच्च माध्यमिक शाळाप्रमुख / प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ.१२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत-
१. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL प्रणाली मधील PFN-ID वरून न घेता २०२५-२६ ला प्रवेशित इ. ११ वी (FYJC) च्या Online data वरून popup करून भरून घेण्यात येणार आहेत. MCVC व ITI च्या विद्यार्थ्यांचा data, online FYJC मध्ये उपलब्ध नाही त्यांनी थेट आवेदनपत्रे भरणे आवश्यक आहे, त्याव्यतिरिक्त ज्यांचा data, FYJC online मध्ये उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांनी विभागीय मंडळात समक्ष जावून आवश्यक ती माहिती सादर करणे आवश्यक आहे. विभागीय मंडळांनी त्या माहितीच्या आधारे soft data तयार करावा व तो पोर्टलवर upload केल्यानंतर त्यांना आवेदनपत्रे भरता येतील याबाबतची sop सर्व विभागीय मंडळांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
२. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी), व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational) विद्यार्थ्यांची माहिती FYJC online मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
३. ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी.
४. २०२६ च्या आवेदनपत्रातील फोटोमध्ये अनेक त्रुटी होत्या. फेब्रुवारी मार्च २०२६ परीक्षेपासून गुणपत्रक व प्रमाणपत्रावर फोटो छपाई होत असल्यामुळे सोबत जोडलेल्या सूचनाप्रमाणे फोटो upload करणेबाबत सूचना देणे, त्याचप्रमाणे प्रवेशपत्रे तयार झाल्यानंतर फोटो व विषयामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात यावे फोटोबाबतच्या सविस्तर सूचना सोबत जोडण्यात आलेल्या आहेत.
५. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे ठराविक संख्येने विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित रक्कमेचा SBI बँकेच्या Online पेमेंट गेटवेद्वारे अचूक रक्कमेचा भरणा करावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये ” Draft” चा “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा “Send to Board” व “Paid” Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
६. यापूर्वी वापरात असणाऱ्या बँकाच्या जुन्या चलनाचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. यांची दक्षता घ्यावी.
७. उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांचे Status Update होईल.
८. आवेदनपत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या नावात, जन्मतारखेमध्ये असंख्य त्रुटी आढळतात. त्यामुळे prelist वर अथवा आवेदनपत्राच्या print out वर विद्यार्थ्यांची / पालकांची स्वाक्षरी घ्यावी.
९. आवेदनपत्रातील चुका टाळण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी अनेक दुय्यम login, college च्या main login मध्ये तयार करून computer lab मध्ये विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रे भरून मुख्य login द्वारे त्याची तपासणी करावी.
१०. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
११. आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
उपरोक्त सर्व बाबी विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
(मा. अध्यक्ष यांच्या मान्यतेने)










