सभागृहात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीस मुदतवाढ देणेबाबत inquiry committee mudatvadh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सभागृहात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीस मुदतवाढ देणेबाबत inquiry committee mudatvadh 

वाचा :- शासन निर्णय क्र. लवेसू-२०२६/प्र.क्र.४१/एस.डी.३/१५८६३८९, दि.२६.०५.२०२६

प्रस्तावना :

सन २०२६ चे पहिले (अर्थसंकल्पिय) अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना क्र. २६४४ उपस्थित करण्यात आली होती. सदर लक्षवेधी सूचना ही प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये हिरवा वाटाणा ऐवजी साधा वाटाणा देण्यात येणे यासंबंधीची होती. सदर लक्षवेधी सूचना दि. १७ मार्च, २०२६ रोजीच्या विधानमंडळाच्या कामकाजात दर्शविण्यात आली होती. सदर लक्षवेधी सूचनेवर सभागृहात चर्चा सुरू असताना सदर विषयाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वि.स.स. यांनी सभागृहात केली होती. सदर लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने सभागृहात निवेदन करताना मा. मंत्री, शालेय शिक्षण यांनी सदर प्रकरणाची सचिव स्तरावर चौकशी केली जाईल असे आश्वासन सभागृहात दिले होते. त्यास अनुसरुन संदर्भिय शासन निर्णयान्वये चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

२. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये हिरवा वाटाणा ऐवजी साधा वाटाणा देण्यात येणे याबाबत चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीची मुदत दि.२६ जुलै, २०२६ रोजी संपुष्ठात आली असल्याने सदर समितीच्या कार्यवाहीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामध्ये हिरवा वाटाणा ऐवजी साधा वाटाणा देण्यात येणे याबाबत तपासणी करुन शिफारशी करण्यासाठी संदर्भाधिन दि.२६ मे, २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीस दि. २६ जुलै, २०२६ पासून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०७३०११०७५६२२४९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment