इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ eleventha online pravesh
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,
मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११००१.
जाहीर प्रकटन,
इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. दिनांक २१/०५/२०२६ रोजी पासून नियमित फेरी १ ची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिनांक २५/०५/२०२६ रोजी पर्यंत १२,४९,५०६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिकेच्या अनुषंगाने पहिल्या नियमित फेरी मधील विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक २६/०५/२०२६ रोजी सकाळी ०६.०० वा. वाढवून देण्यात येत आहे.
विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी. ही विनंती.











