प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेंतर्गत स्वच्छता, आहार दर्जा, आहाराचे प्रमाण, आहाराची चव व इतर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत pm poshan mid day meal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेंतर्गत स्वच्छता, आहार दर्जा, आहाराचे प्रमाण, आहाराची चव व इतर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत pm poshan mid day meal 

परिपत्रक

विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेंतर्गत स्वच्छता, आहार दर्जा, आहाराचे प्रमाण, आहाराची चव व इतर मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वी च्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून भारतीय अन्न महामंडळामार्फत (FC) सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.

योजनेंतर्गत पात्र शाळेतील प्रत्येक शालेय बालकासाठी स्वच्छ, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छता, आहार दर्जा, आहाराचे प्रमाण, आहाराची चव इत्यादीबाबत सर्व संबंधित शाळांनी आणि क्षेत्रीय यंत्रणेने खालील मुद्द्यांचे तंतोतंत पालन करावे:

१. स्वच्छता (Hygiene):- शालेय पोषण आहार शिजवण्याची जागा, स्वयंपाकाची भांडी, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ असणे आवश्यक आहे. स्वयंपाकी मदतनीसांनी स्वच्छता नियमांचे (उदा. अॅप्रन-टोपीचा वापर करणे, स्वच्छ हात धुणे इ.) पालन करावे. आहार देताना विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था स्वच्छ ठिकाणी असावी. जसे व्हरांड्यात असावी किंवा बस्करपट्टी असावी. विद्यार्थी मैदानात किंवा मातीमध्ये बसून आहार घेणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

२. आहार दर्जा (Quality):- जिल्हानिहाय निश्चित केलेल्या पाककृतीनुसार आहार द्यावा.

निकषांनुसार पदार्थांचे प्रमाण, भाजीपाला इ. द्वारे पौष्टिक, संतूलित व दर्जेदार आहार विद्यार्थ्यांना मिळेल याची दक्षता सर्व शाळांनी व केंद्रिय स्वयंपाकगृहांनी घ्यावी. शालेय विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय नियुक्त पुरवठेदाराकडून पुरविला जाणारा तांदुळ व धान्यादी माल योग्य दर्जाचा व मागणीनुसार योग्य वजनाचा असल्याची खात्री करुनच शाळास्तरावर/केंद्रीय स्वयंपाकगृहस्तरावर स्विकारण्यात यावा.

३. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाः- शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवताना तसेच आहार बनवण्यासाठी

शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ करून पिण्याचे पाणी पूर्णपणे स्वच्छ, सुरक्षित व निर्जतूक राहील याची विशेष दक्षता घ्यावी.

४. HFSS पदार्थास बंदी:- शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात उच्च फॅट्स, साखरेचे व

मिठाचे प्रमाण असलेले (HFSS High Fat, Sugar, Salt) आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या जंक फूड / खाद्यपदार्थ विक्रीस बंदी आहे. त्यानुसार, उच्च फॅट्स, साखरेचे व मिठाचे प्रमाण असलेल्या (HFSS High Fat, Sugar, Salt) खाद्यपदार्थांची शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात विक्री केली जाणार नाही/होणार नाही, याबाबत शाळेच्या दर्शनी भागात फलक लावावा तसेच इतर आवश्यक त्या उपाययोजना संदर्भीय क्र.३ च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनेनुसार करण्यात याव्यात.

५. माता पालकांकडून आहाराची चव घेणेः शाळेतील विद्यार्थ्यांना आहार

देण्यापूर्वी माता पालकांना आहाराची चव घेण्यासाठी बोलवावे. माता पालकाने त्या आहाराची चव घेतल्यानंतर त्यांचेकडून चवीबाबतचा अभिप्राय चव नोंद रजिस्टरला नोंदविण्यात यावा. तसेच, यापूर्वी चव नोंद रजिस्टरबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे देखील पालन करणे आवश्यक आहे.

६. अन्न सुरक्षा फलक (Board) लावणेः अन्न सुरक्षा व मानके (शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न

आणि संतुलित आहार) विनियम, २०२० नुसार शाळेच्या दर्शनीय भागात अन्न सुरक्षा फलक सुस्पष्ट दिसेल असा लावण्यात यावा.

७. शाळा भेटी:- जिल्हा/तालुकास्तरीय गठीत भरारी पथकांमार्फत नियमितपणे शाळांना अचानक भेटी देऊन आहाराच्या गुणवत्तेची, स्वच्छतेची तपासणी करावी तसेच नियमित शाळा भेटीनंतर शैक्षणिक शाळा भेट प्रपत्रात पीएमपोषण योजनेच्या अंमलबजावणीबाबत अभिप्रायाची नोंद करावी.

८. शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी (SMC):- विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची दैनंदिन चव घेणे (Tasting) तसेच व गुणवत्ता तपासण्याची शाळा व्यवस्थापन समिती (SMC)

आणि मुख्याध्यापक यांची राहील.

९. अद्ययावत लेखे – नोंदी (Updated Records & Accounts):- शाळास्तरावर पुरवठा करण्यात

आलेला तांदुळ व धान्यादी माल दैनंदिन वापर, शिल्लक साठा आणि खर्चाचे सर्व लेखे व अभिलेखे (Registers) पूर्णपणे अद्ययावत ठेवण्यात यावेत.

१०. दैनंदिन नोंदः- शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेले विद्यार्थी आणि प्रत्यक्षात शालेय पोषण आहार घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंद दररोज एमडीएम पोर्टल व नोंदवही मध्ये नोंद घेण्यात यावी.

११. करारनामा प्रत उपलब्ध करुन देणे:- जिल्हानिहाय नियुक्त पुरवठेदार यांचेसोबत करण्यात

आलेल्या करारनाम्याची प्रत पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात यावी. तसेच केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत नियुक्त संस्था/बचतगट यांचे करारनामे महानगरपालिका/नगरपालिका तसेच नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर ठेवण्यात यावेत.

वरील सर्व सूचना व यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले पत्र, आदेश, परिपत्रके व शासन निर्णय याद्वारे दिलेल्या सूचनांचे सर्व तालुकास्तरीय पर्यवेक्षीय यंत्रणा यंत्रणेने, केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांनी काटेकोरपणे पालन करणेची दक्षता घेणेत यावी.

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment