पर्यावरण पूरक सण साजरे करण्याच्या अनुषंगाने मूर्ती विसर्जनाबाबतच्या दि. १ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत paryavaran purak festival celebration
महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः याचिका- २०२४/प्र.क्र.३४/तां.क.३ नवीन प्रशासन भवन, १५ वा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १ सप्टेंबर, २०२६
संदर्भ
:- १) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा दि.२४.०७.२०२५ रोजीचा अंतरिम आदेश.
२) पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग समक्रमांकाचा शासन निर्णय दि.१ ऑगस्ट, २०२५
३) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि. १४.०८.२०२६ व दि.२०.०८.२०२५ रोजीचे अंतरिम आदेश
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. ९६/२०२४ (रोहीत जोशी व इतर वि. महाराष्ट्र शासन व इतर) व इतर न्यायालयीन प्रकरणे यामध्ये दिनांक २४ जुलै, २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार प्लास्टर ऑफ पॅरीस (पी.ओ.पी.) मूर्ती विसर्जनाबाबत दि. ०१.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. सदर मार्गदर्शक सूचना हया दि. ३१.०३.२०२६ पर्यंत लागू होत्या.
जनहित याचिका ९६/२०२४ व श्री. रोहीत जोशी यांच्या IA No.४२१७/२०२६ अर्जावर मा. उच्च न्यायालयात दि. १५.०७.२०२६ पासून सुनावणी सुरू होती. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून मा. न्यायालयाने दि. १४.०८.२०२६ व दि. २०.०८.२०२६ रोजी अंतरिम आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सदर प्रकरणी निकाल जाहीर होईपर्यंत, दि. २४.०७.२०२५ रोजीचे आदेश अंमलात राहतील. सबब, मा. उच्च न्यायालयाच्या दि. २४.०७.२०२५ रोजीच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी निर्गमित करण्यात आलेला दि.०१ ऑगस्ट, २०२५ रोजीचा शासन निर्णय व त्यान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना मा. उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत लागू राहतील.
त्यानुषंगाने पर्यावरण पूरक सण साजरे करण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरीस (पी.ओ.पी.) मूर्ती विसर्जनाबाबतच्या दिनांक १ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या मार्गदर्शक सूचना सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत लागू असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सदर मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी. (दि.१ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत.)
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०९०११३०११९५५०४ असा आहे. सदरचे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने












