रा.प.महामंडळाद्वारे प्रवाशांना देण्यात येणा-या NCMC कार्ड दि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन अनिवार्य असलेबाबत state travelling ncmc card compulsory 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रा.प.महामंडळाद्वारे प्रवाशांना देण्यात येणा-या NCMC कार्ड दि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन अनिवार्य असलेबाबत state travelling ncmc card compulsory 

संदर्भ-

१. पत्र क्र.राप/वाह/सवलत/१५८२, दि.०२/०४/२०२६.

२. पत्र क्र.राप/वाह/एनसीएमसीकार्ड/३००६, दि.०४/०५/२०२६.

३. पत्र क्र.राप/वाह/एनसीएमसीकार्ड/४८०७, दि.३०/०७/२०२६.

उपरोक्त विषयानुसार रा.प. महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशांनुसार सवलतधारी तसेच विनासवलतधारी प्रवाशांना NCMC कार्ड देण्यात येत आहे. सदर NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाकरिता मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लि. यांचेद्वारे रा.प. आगार, बसस्थानके तसेच आगार हद्दीबाहेर अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला यांचे NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरण कार्यवाही सुरु असुन, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारी प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरण कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

रा.प. महामंडळाद्वारे देण्यात आलेले NCMC कार्ड ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना दि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन अनिवार्य करण्यात येत आहे. दि.०१ सप्टेंबर २०२६ पासुन ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांना सवलतीचे तिकीट NCMC कार्ड मधुनच वितरीत करण्यात यावे. तसेच रा.प. वाहकांनी NCMC कार्डचे Top-up देखील करावयाचे आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) संदर्भित पत्र क्र.०१ अन्वये पाठविण्यात आलेली आहे.

सबब, आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, वरील प्रमाणे नमूद बाब आपल्या अखत्यारित येणा-या सर्व आगार व्यवस्थापकांना अवगत करुन, आगारातील सर्व चालक तथा वाहक तसेच वाहक यांना सुचना देण्यात यावेत.

Related posts:

Leave a Comment