राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत ai saathi for educators diksha portal course link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील “AI Saathi for Educators” (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत ai saathi for educators diksha portal course link

संदर्भ: या कार्यालयाचे पत्र क्र. SCERT-28.0/32/2025-IT/BROADCAST MEDIA 1/2022467/2026, दिनांक १५/०७/२०२६

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना “AI Saathi for Educators” हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. सदर कोर्ससाठी दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे.

या कोर्स ची दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पर्यंतचीची सद्यस्थिती :

कोर्ससाठी एकूण नोंदणी २,३९, १४९; त्यापैकी १,४३,०५६ शिक्षकांनी कोर्स पूर्ण केला आहे.

तरी, आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शिक्षकांनी अद्याप कोर्ससाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी

नोंदणी करावी. तसेच, नोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपल्या सोयीच्या वेळेनुसार सदर कोर्स पूर्ण करावा. सदर कोर्ससाठी ४ तासांचे CPD प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे.

तरी, आपल्या अधिनस्त सर्व संबंधित शाळांना आवश्यक सूचना देऊन सर्व शिक्षकांची कोर्ससाठी नोंदणी व कोर्स पूर्णत्वाची कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण होईल, याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

कोर्स लिंक https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=1252&section=2814&modeActive=8202

दीक्षा ॲप लिंक https://www.diksha.gov.in

Related posts:

Leave a Comment