राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत tappa anudan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत tappa anudan paripatrak 

संदर्भ :-

१. शासन निर्णय उमावि-२०२३/प्र.क्र.९३/एसएम-४, दि. १५ मार्च, २०२४

२. शासन निर्णय क्र. प्रामाशा-२०२५/प्र.क्र.१०६/एसएम-४, दि. २५ ऑगस्ट, २०२५

३. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांचे पत्र क्र. शिसंमा-२५/(ए-०२)/पटवर्धन /मुल्यांकन/ई. ऑ. ६१५७४८७/ एस-६, दि.१३ ऑक्टोबर, २०२५

प्रस्तावना :-

राज्य शासनाच्या मुल्यांकनाच्या सुधारीत निकषांनुसार पात्र होणाऱ्या शाळा व तुकडयांना वेतन अनुदान टप्प्याटप्प्याने अनुज्ञेय करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर निकषांनुसार पात्र झालेल्या शाळा व तुकड्यांना राज्य शासनाद्वारे वेळोवेळी वेतन अनुदानाचा टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे. तथापि मुल्यांकनानुसार पात्र होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळा/ तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रकरणातील मा. उच्च न्यायालयाचे आदेश, वित्त विभागाच्या दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने संदर्भक्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये अनुदानासाठी पात्र करण्यात आले आहे.

२. भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित कै. सौ. विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमान रमेशजी करीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालयास संदर्भक्र. २ येथील शासन निर्णयान्वये ४० टक्के अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे. आता, दि. २५ ऑगस्ट, २०२५ च्या शासन निर्णयामध्ये, दि. १५ मार्च, २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा समावेश करुन अनुदानाचा पुढील टप्पा अदा करण्याची विनंती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये केली आहे.

संदर्भ क्र.२ येथील दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुदानास पात्र सर्व शाळा/महाविद्यालयांना सरसकट अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे. भारत शिक्षण मंडळ, रत्नागिरी संचलित कै. सौ. विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व श्रीमान रमेशजी करीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी या कनिष्ठ महाविद्यालय या शाळांचा समावेश अनुदानित शाळांच्या यादीमध्ये करुन पुढील टप्पा अनुदानाकरीता या शाळांचा समावेश करुन क्षेत्रीय स्तरावरुन शासनास प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. तथापि, त्यानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. यास्तव शासन निर्णय दि.२५.०८.२०२५ मध्ये संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाचा समावेश नसल्यामुळे, सदर शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी शासन पूरकपत्र निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन परिपत्रक-

शासनाच्या उपरोक्त संदर्भ क्र. २ येथील दि.२५.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उक्त दि. २५ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील वाचा येथील अ.क्र. (२५) नंतर खालील तक्त्यात नमूद केलेला शासन निर्णय समाविष्ट करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment