“विद्यांजली २.०” पोर्टलवर शाळांची १०० टक्के नोंदणी तसेच शाळांच्या गरजेनुसार साहित्य मागणी प्रस्ताव सादर करण्याबाबत vidhyanjali portal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“विद्यांजली २.०” पोर्टलवर शाळांची १०० टक्के नोंदणी तसेच शाळांच्या गरजेनुसार साहित्य मागणी प्रस्ताव सादर करण्याबाबत vidhyanjali portal 

संदर्भ :

१) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.N.4-2/2022/KT, दि.८.०१.२०२५

२) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचा दूरध्वनी संदेश दि.१.०४.२०२६

३) मा.आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांचे बैठकीतील निर्देश दि.२.०४.२०२६

४) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे-३० यांचे पत्र जा.क्र. राशेसंप्रपम/सा.शा.वि./विद्यांजली/२०२६, दि.–.०४.२०२६

उपरोक्त विषय व संदर्भान्वये कळविण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मधील उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आलेली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली

यांच्यामार्फत “विद्यांजली २.०” हे वेबपोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

“विद्यांजली २.० Volunteer Management Programme” हा कार्यक्रम शाळांसाठी सहाय्यभूत असून, दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करुन देण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या कोणताही मोबदला किंवा मानधन न घेता शासकीय व अनुदानित शाळांना विविध प्रकारची सेवा व सहकार्य प्रदान करु शकतात. तसेच शाळा गुणवत्ता विकास उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. कृतीशील ज्येष्ठ नागरिक, माजी विद्यार्थी, स्थानिक समुदायातील व्यक्ती, शिक्षित स्वयंसेवक, निवृत्त शासकीय/निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, वैज्ञानिक, सशस्त्र दलातील व्यक्ती, गृहिणी व इतर साक्षर व्यक्ती शाळांच्या गरजेनुसार स्वयंसेवक म्हणून कार्य करु शकतात. हे स्वयंसेवक तज्ज्ञ सेवा, कौशल्य विकास, साहित्य, उपकरणे, मालमत्ता तसेच प्रशासकीय सहाय्य इ. स्वरुपात योगदान देऊ शकतात.

तसेच शैक्षणिक संस्थांना बळकटी देण्यासाठी कंपन्या, नागरी संस्था व शासकीय संस्थांकडून संसाधने उपलब्ध व्हावीत यासाठी ऑक्टोबर २०२४ पासून विद्यांजली पोर्टलवर विशेष CSR मॉड्यूल विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून डिजिटल पायाभूत सुविधा, सहशालेय उपक्रम, क्रीडा साहित्य, मूलभूत नागरी सुविधा इत्यादी ११ व्यापक विषयांअंतर्गत जिल्हानिहाय CSR प्रकल्प तयार करुन पोर्टलवर अपलोड करण्यात येतात.

१) जिल्हयातील १०० टक्के शाळांची विद्यांजली २.० पोर्टलवर नोंदणी पूर्ण करणे.

२) जिल्हयातील CSR स्त्रोतांशी समन्वय वाढविणे.

३) स्वयंसेवक सहभाग वाढीसाठी चर्चा सत्रांचे आयोजन करणे.

४) समाज माध्यमांद्वारे जनजागृती करणे.

५) UDISE वरील जिल्हानिहाय माहितीच्या आधारे शाळांना आवश्यक साहित्य मागणीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन करणे.

६) तसेच सर्व शांक्षांनी त्यांच्या गरजांनुसार मागणी पोर्टलवर भरणे.

तसेच विद्यांजली २.० पोर्टलसंदर्भातील पूर्वीच्या सुचनांनुसार जिल्हा स्तरावर सर्व तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी यांची “तालुका नोडल अधिकारी” म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही प्रशासकीय बदल झले असल्यास संबंधित तालुक्याच्या विद्यमान गटशिक्षणाधिकारी यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.

तालुका नोडल अधिका-यांनी तालुक्यातील सर्व शाळांची विद्यांजली २.० पोर्टलवर नोंदणी पूर्ण करुन शाळांकडून आवश्यक साहित्य मागणी प्रस्ताव वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार सादर करण्यात यावेत, याची दक्षता घ्यावी.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment