शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी दिनांक-१५ जुलै, २०२६ ते ३० जुलै, २०२६ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत shalabahya sarvekshan
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. तरी या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक-१५ जुलै, २०२६ ते ३० जुलै, २०२६ या कालावधीमध्ये सर्वेक्षण राबविण्याचे ठरविले असून त्याबाबतची SOP व माहिती संकलनाचे formats तयार केली आहे. SOP ची प्रत व माहिती संकलनाचे formats सुलभ सदर्भासाठी सोबत जोडली आहे.
सदरचे महत्वपूर्ण सामाजिक काम हे केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे केवळ अशक्यप्राय बाब असल्याने यात संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.
तरी आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या विभागांच्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामीण व नागरी भागातील सर्व स्तरावरील कार्यालयांना सदरच्या महत्वपूर्ण कामात सर्वोतोपरी मदत करण्याबाबत आदेशित करावे. तसेच ज्या काही योजना व इतरही काही सुविधा आपल्या विभागांकडून सदर बालकांना उपलब्ध करून देणे शक्य होईल त्या कृपया उपलब्ध करून द्याव्यात की जेणे करून सदर सर्वेक्षणाचे काम फलदायी व अर्थपूर्ण होईल.








