“भारतीय भाषा शिबीर” शाळामध्ये आयोजित करण्याबाबत indian language shibir 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“भारतीय भाषा शिबीर” शाळामध्ये आयोजित करण्याबाबत indian language shibir 

संदर्भ : १. मा. सह सचिव, शिक्षण मंत्रालय, स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचे D.O.No. 10-14/2025 NCERT, दिनांक २७ एप्रिल २०२६ चे पत्र.

२. सहसंचालक (प्रशासन), MPSP, मुंबई यांचे दिनांक ०५/०६/२०२६ रोजीचे अधिकृत ई-मेल आदेश.

३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांचे जा.क्र. राशैसप्रपं/मभावि/३०३/२०२६, दिनांक २९/०६/२०२६ चे पत्र.

उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मधील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या तरतुदीनुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये “भारतीय भाषा शिबीर २०२६” आयोजित करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यामार्फत प्राप्त झाले आहेत. (संदर्भ क्र. २). या भाषा शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेव्यतिरिक्त इतर किमान एका भारतीय भाषेची गमतीशीर व आकर्षक पद्धतीने ओळख करून देणे आणि त्यांच्यात मूलभूत संभाषण कौशल्ये विकसित करणे हा आहे. सदर उपक्रमांतर्गत NCERT मार्फत विकसित करण्यात आलेला एकूण २८ तासांचा ‘कॅप्सूल कोर्स’ राबवायचा असून, प्रत्येक शाळेमध्ये किमान ७५ ते १०० इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग असणे बंधनकारक आहे.

सध्या नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने, संदर्भीय मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र. ३.४ नुसार, सदर २८ तासांचा कोर्स नियमित शाळेच्या वेळेव्यतिरिक्त, आठवड्याच्या शेवटी (शनिवार रविवार) सुट्टीच्या दिवशी अथवा दररोज शालेय वेळेनंतर १ तास याप्रमाणे १४ दिवसांच्या कालावधीत स्थानिक शैक्षणिक दिनदर्शिका व गरजा लक्षात घेऊन लवचिकतेने आयोजित करावा,

सदर शिबिराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालील बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावीः आपल्या तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना या संदर्भात तात्काळ आदेश निर्गमित करून शिबिराचे नियोजन करावे,

आयोजित केलेल्या शिबिरांची दैनंदिन माहिती, अहवाल व उत्कृष्ट छायाचित्रे (Photographs) शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत लिंकवर वेळेत अपलोड करण्याची जबाबदारी शाळांची असून जबाबदारी आपल्या स्तरावरून सुनिश्चित करावी.

सदर कार्यक्रमाच्या तालुकास्तरीय समन्वयासाठी व संनियंत्रणासाठी गटशिक्षणाधिकारी यांची ‘तालुका नोडल अधिकारी’ व भाषा विभागाचे काम पाहणारे साधनव्यक्ती यांची ‘समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तरी, आपल्या स्तरावरून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये हे शिबीर सोबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार केंद्रसमन्वयक यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या राबवून, केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल डाएट कार्यालयाकडे सादर करावा.

अधिक माहिती किंवा शंका समाधानासाठी श्री. रामदास टोणे (जिल्हा नोडल अधिकारी) डायट सोलापूर ७७१९८८२६३९ व श्री. सुहास गुरव (सहा. नोडल अधिकारी) जि. प. (शिक्षण विभाग) सोलापूर ८८०५९८६७४५ यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. सोबत : मार्गदर्शक सुचना

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment