सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत ekyc sevartha pranali 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेवार्थ प्रणालीतील अधिकारी/कर्मचारी यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत ekyc sevartha pranali 

वाचाः-१. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२९/कोषा प्रशा-४, दि.२७ मार्च, २०२६

शासन परिपत्रक :-

“वाचा-१” येथील परिपत्रकान्वये, सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांनी माहे एप्रिल, २०२६ देय मे, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

तथापि, अद्यापि काही प्रशासकीय विभागांकडून सदरची कार्यवाही पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांनी माहे मे, २०२६ देय जून, २०२६ या वेतन देयकाअगोदर ई-केवायसी पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी गांभिर्याने नोंद घ्यावी.

२. सदरची मुदतवाढ ही सर्व जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग (शालार्थ प्रणाली), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्लित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये/संस्था, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या मान्यताप्राप्त व अनुदानित आश्रमशाळा व संस्था, वैद्यकीय विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण/कौशल्य विकास विभागाच्या अधिनस्त संस्था, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील संस्था यांनादेखील लागू राहील.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२६०४२३१८०७१७३५०५ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Leave a Comment