४१ वी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा २०२६ परीक्षार्थीसाठी प्रकटन maharashtra state eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

४१ वी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा २०२६ परीक्षार्थीसाठी प्रकटन maharashtra state eligibility test 

दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील आवश्यक ती सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपापली प्रवेशपत्रे अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घ्यावीत. तसेच, परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण सूचना याच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व उमेदवारांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून त्यांचे काटेकोरपणे अनुपालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा, अनधिकृत वृत्त अथवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. परीक्षेसंदर्भातील अधिकृत माहितीसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचाच आधार घ्यावा, असेही आवाहन सर्व परीक्षार्थीना करण्यात येत आहे.

सर्व परीक्षार्थीनी परीक्षेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सेट परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.

४१ व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.

Related posts:

Leave a Comment