सन २०२६-२७ करीता राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरीत करणेबाबत 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ करीता राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन निधी वितरीत करणेबाबत

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासननिर्णयक्रमांकः उमेद २०२६/प्र.क्र.१०१/ई-१७६८८३६/योजना-३

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: २३ ऑक्टोबर, २०२६.

वाचा :-

१. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय, क्र. उमेद-२०२३/प्र.क्र.७३/योजना-३, दिनांक २६ सप्टेंबर, २०२३.

२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक ०९ एप्रिल, २०२६.

३. केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.जे-१२०२५-०१/२०२६-आरएल (एसएनए_०३), दिनांक २८ एप्रिल, २०२६.

४. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०२६/प्र.क्र.४०/अर्थ ३, दिनांक ०७ मे, २०२६.

५. ग्राम विकास विभागाचा सम क्रमांकाचा दिनांक २२ सप्टेंबर, २०२६ रोजीचा शासन निर्णय.

६. मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. एस. आर. एल. एम, बेलापूर, नवी मुंबई यांचे पत्र क्र.एमएसआरएलएम/ले. व वि./कार्या-०५/जा.क्र.१६४२/२०२६, दिनांक ११.०९.२०२६.

७. मुख्य कार्यकारी अधिकारी, एम. एस. आर. एल. एम, बेलापूर, नवी मुंबई यांचे पत्र क्र. एमएसआरएलएम/ले. व वि./कार्या-०५/जा.क्र.१६४३/२०२६, दिनांक ११.०९.२०२६.

प्रस्तावना :-

संभाजीनगर येथील दिनांक १६.०९.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्यःस्थितीत “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन “अ” वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- व वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत संदर्भाधिन क्र.१ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सन २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत या

योजनेसाठी (२५०१ ए१८२) या लेखाशीर्षाखाली रक्कम रुपये १६०००.०० लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीमधून संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये रु.७३२३.७००० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला असून संदर्भ क्र. ६ व ७ अन्वये सादर केलेल्या निधी वितरणाचा प्रस्तावाच्या अनुषंगाने माहे ऑगस्ट, २०२६ व सप्टेंबर, २०२६ असे दोन महिन्यांचे समुदाय संसाधन व्यक्तींना मानधन रक्कम रुपये २९,२९,४८,०००/- इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णयः-

सन २०२६-२७ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना अतिरिक्त फिरता निधी (राज्य हिस्सा) (२५०१ए१८२) याकरिता केलेल्या तरतूदीतून रक्कम रुपये २९,२९,४८,०००/- (रुपये एकोणतीस कोटी एकोणतीस लक्ष अड्ठेचाळीस हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात येत आहे.

२. सदर रक्कम उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, नवी मुंबई यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे.

३. सदर रक्कम रुपये २९,२९,४८,०००/- (रुपये एकोणतीस कोटी एकोणतीस लक्ष अठेचाळीस हजार फक्त) चा खर्च “मागणी क्र. एल ३, २५०१, ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम, ०६, स्वयंरोजगार कार्यक्रम, १०१, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) (२१) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संदर्भ क्र. ३ अन्वये केंद्र शासनाच्या पत्रानुसार सप्टेंबर, २०२६ पर्यंतच समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना फिरता निधी (अतिरिक्त राज्य हिस्सा), ३३ अर्थसहाय्य, (२५०१ ए१८२)” या लेखाशिर्षाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदी मधून भागवावा.

४. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावे. अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची अमंलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरीत लेखाधिकारी कार्यासन क्रमांक योजना-२, ग्राम विकास विभागयांचेकडे पाठवावी. १) मंजूर केलेली रक्कम, २)

कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयातील रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र.

६. सदर शासन निर्णय वित्त विभाग परिपत्रक्र दिनांक ०९ एप्रिल, २०२६ व ०७ मे, २०२६ रोजी नुसार वितरित करण्याच्या प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभागाचा अनौ. संदर्भ क्र.६३५/२०२६/व्यय-१५, दिनांक १५.१०.२०२६ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१०२३१२०३१०७४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment