सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत online pravesh prakriya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत online pravesh prakriya 

:- १. शासन पत्र क्र. आरटीई २०२६/प्र.क्र.०१/एसडी-१, दि. ०५-०१-२०२६

२. संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं/आरटीई ८०१/२०२६/४३५२, दि. ०६-०१-२०२६

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. ०९-०१-२०२६ पासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा आरटीई २५ टक्के प्रवेश सन २०२६-२७ मध्ये प्रविष्ट होणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी उपरोक्त सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये दि. ०९-०१-२०२६ ते दि. १९-०१-२०२६ या कालावधीत विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी.

Related posts:

Leave a Comment