माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणारी फी, माहितीचे शुल्क व दंड यांची रक्कम जमा करण्याबाबत right to information circular
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः साप्रवि-१२०२५/६/२०२६-साप्रवि (कक्ष-६)
१९ वा मजला, नवीन प्रशासन इमारत, मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०००३२.
दिनांक : २३ ऑक्टोबर, २०२६.
संदर्भ : १. शासन परिपत्रक क्र. केंमाअ २००७/ प्र.क्र.३४/०७/५, दि. ०९ मे २००७.
२. शासन शुद्धिपत्रक, क्र. कॅमाअ २००७/ प्र.क्र.३४/०७/५, दि. २८ मे २००७.
शासन परिपत्रक :
संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क तसेच सदर अधिनियमाच्या तरतुदींनुसार लादण्यात येणारी शास्ती/दंडाची रक्कम “००७०, इतर प्रशासनिक सेवा, ६०, इतर सेवा, ८००, इतर जमा रकमा, १८, माहितीचा अधिकार (००७०-०१६-१) या लेखाशीर्षाखाली जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि, सदर परिपत्रकात नमूद केलेले लेखाशीर्ष GRAS प्रणालीमध्ये तसेच, महसूल व जमा यांचे तपशीलवार अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक यामध्ये उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
२. माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त होणाऱ्या रकमांच्या जमा व लेखांकनासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय वर्गवारीचा विचार करता, सदर रकमा जमा करण्यासाठी योग्य लेखाशीर्षाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यानुसार, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणारी फी, माहितीचे शुल्क तसेच सदर अधिनियमांतर्गत लादण्यात येणारी शास्ती/दंडाची रक्कम जमा करण्यासाठी खालील लेखाशीर्षाचा वापर करण्यात यावा :-
००७०, इतर प्रशासनिक सेवा,
६०, इतर सेवा,
११८, माहिती अधिकार अधिनियम, २००५ खाली जमा रकमा
(00)
(००) (०१), माहिती अधिकार अधिनियम, २००५ खाली जमा रकमा
लेखाशीर्ष संकेतांक: ००७०-०१९९
३. सर्व मंत्रालयीन विभाग, विभागप्रमुख, सार्वजनिक प्राधिकरणे, जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय प्राधिकारी तसेच राज्य माहिती आयोगाच्या संबंधित कार्यालयांनी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणारे शुल्क व शास्ती/दंडाची रक्कम जमा करताना उपरोक्त लेखाशीर्षाचा वापर करावा.
४. संदर्भाधीन शासन परिपत्रक दिनांक ०९ मे २००७ मधील माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त होणाऱ्या शुल्क व दंडाची रक्कम जमा करण्यासाठी नमूद केलेल्या लेखाशीर्षासंबंधीच्या सूचना, तसेच त्यासंबंधीचे शुद्धिपत्रक दिनांक २८ मे २००७, या परिपत्रकाद्वारे सुधारित करण्यात येत आहेत. यापुढे सदर रकमांच्या जमा व लेखांकनासाठी या परिपत्रकात नमूद केलेल्या लेखाशीर्षाचा वापर करण्यात यावा.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून, त्याचा संगणक संकेतांक २०२६१०२३१५४२५९८१०७ असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,










