३ पदवीवर व २ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत padvidhar shikshak matdarsangha circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

३ पदवीवर व २ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत padvidhar shikshak matdarsangha circular 

संदर्भ :- श्री. अरविंद शेटे, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महा.रा. यांचे पत्र क्रं. बीआयई/२०२६/प्र.क्र.१५७/२६/३३/नि-१, दि.०१/१०/२०२६

भारत निवडणूक आयोगाच्या दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे विभाग व नागपूर विभाग या पदवीधर तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

सदर निवडणुकीचे मतदान दिनांक २३ ऑक्टोबर, २०२६ (शुक्रवार) रोजी सकाळी ८.०० ते सायं. ४.०० पर्यंत व मतमोजणी दिनांक २७ ऑक्टोबर, २०२६ (मंगळवार) रोजी होणार आहे.

या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५७ नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३.०६.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर केलेली आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

तरी आपल्या स्तरावरुन सर्व मतदार असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारांना सूचना देण्यात याव्यात.

Related posts:

Leave a Comment