“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करणेबाबत (e-KYC Aadhaar Authentication)
संदर्भ :
१. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.१६/कार्या-२. दिनांक २८.०६.२०२४
२. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मवाधि-२०२५/प्र.क्र.१६७/कार्या-२, दिनांक १८.०१.२०२५
3. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबाधि-२०२५/प्र.क्र.१६७/कायाँ-२, दिनांक १८. ११.२०२५
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते को, मुख्यमंत्री माझी लाडकी वहोण या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडीलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्रापत होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वःताचे e-KYC केल्यानंतर त्यांचे पति अथवा वडिल यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांचेकडे दिनांक 31.12.2025 पर्यंत जमा करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.
या अनुषंगाने आपले अधिनस्त (CDPO) ग्रामीण / नागरी यांचे मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेले -KYC अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कडे दाखल करण्यात यावेत. e-KYC करण्यापासून सुट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविका साठीचा नमूना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचेकडे स्वयंस्पष्ट शिफारशी सह विहित कालमार्यदेत -KYC चे अर्ज सादर करावेत.









