PAT Live Report, त्याचे फायदे व अध्यापनात उपयोग तसेच सदरील report डाउनलोड करण्याचाबतचे ऑनलाईन प्रशिक्षण pat live report download online training circular
संदर्भ: 1) मा. संचालक यांचे पत्र क्र. SCERT-28.0/11/2026IT/BROADCASTMEDIA, I/1727047/2026 दि.17/०२/२०२७
2) मा. संचालक यांचे पत्र क्र. SCERT28.0/11/2026IT/BROADCASTMEDIA, 1/2082324/2026
दि. 14/०४/२०२७
3) मा. आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र जा. क्र. प्राशिसं 2026/मापारी/मेळावा/301 दि.27/08/2026
वरील संदर्भीय विषयान्वये मा. आयुक्त (शिक्षण) यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रत्येक शैक्षणिक वर्षात एकूण चार माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करून त्यात PAT बाबत चर्चा होणे आवश्यक असल्याचे संदर्भीय पत्र क्र ३ नुसार सूचित केले आहे.
विद्या समीक्षा केंद्र (VSK) मार्फत PAT Live Report डाउनलोड करण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि सद्य स्थितीत केवळ ७०,००० शिक्षकांनी हा अहवाल डाउनलोड केल्याचे दिसून येत आहे PAT मध्ये एकूण ७८,००० शाळांनी PAT ३ चे गुणांकन हे VSK च्या chatbot वर नोंदविले आहे त्यापैकी केवळ १५,००० शाळांनी अहवाल डाउनलोड केला आहे त्यामुळे या बाबत शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करून शिक्षकांचे उद्बोधन करण्याची आवश्यकता आहे. सदरील प्रशिक्षणात PAT Live Report डाउनलोड करण्याची प्रक्रिया, त्याचे वाचन व अध्यापनातील उपयोग याबाबत मार्गदर्शन होईल.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात केंद्रस्तरावर होणाऱ्या शिक्षण परिषदा तसेच शाळा स्तरावर होणाऱ्या माता पालक शैक्षणिक मेळाव्यात सदरील PAT Live Report चे वाचन व चर्चा झाल्यास पालकांनाही आपल्या पाल्याच्या अध्ययन निष्पत्ती, संपादणुकीची सद्यस्थिती समजून येईल.
SCERT मार्फत घेण्यात येणाऱ्या Periodic Assessment Test (PAT / संकलित चाचणी) चा निकाल सद्यस्थितीत SwiftChat या Application द्वारे “PAT Live Report” या स्वरूपात प्रत्येक शाळेला वर्ग निहाय, उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अहवालामध्ये वर्गाची जिल्हा व राज्याशी तुलनात्मक कामगिरी, विषयनिहाय व अध्ययन निष्पत्तीनिहाय (Learning Outcome-wise) कामगिरी, विद्यार्थ्यांची विषयनिहाय एकूण कामगिरी तसेच उपचारात्मक अध्यापनाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे विषयनिहाय गट (कोहॉर्ट) याबाबतची माहिती समाविष्ट असते. तथापि, Dashboard व VSK Data बरून असे निदर्शनास आले आहे की, अनेकांना सदर अहवाल डाउनलोड करण्याची कार्यपद्धती तसेच त्याचा अध्यापन नियोजनासाठी प्रत्यक्ष उपयोग याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. परिणामी, उपलब्ध डेटाचा उपयोग उपचारात्मक अध्यापनासाठी अपेक्षित प्रमाणात होताना दिसत नाही.
या करीता राज्यस्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण SCERT च्या YouTube channel द्वारे Live प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणास सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित राहतील या करीता आपल्यास्तरावरून कार्यवाही करण्यात यावी. सदरील प्रशिक्षण हे शुक्रवार दि 23/10/2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदरील प्रशिक्षणासाठी अधिकारी वर्ग यांना ईमेल द्वारे zoom meeting ची लिंक देण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. सदरील लिंक ही केवळ अधिकारी वर्गासाठी राहील,
Live Report करीता मार्गदर्शक सूचनाः
मुख्याध्यापक व शिक्षक यांनी प्रशिक्षणाच्या दिवशी SCERT च्या या YouTube लिंक (www.youtube.com/@SCERTMaharashtra) ला भेट द्यावी. प्रशिक्षण चालू असताना YouTube च्या Description मध्ये उपस्थिती नोंद करण्यासाठी लिंक दिल्या जाईल. त्यावर केवळ इंग्रजी अक्षरे अंक वापरून लिंक मधील माहिती भरल्या जाईल याची दक्षता घ्यावी. सदर लिंक प्रशिक्षानंतर दि. 25/10/2026 रोजी रात्री 00:00 वाजता बंद करण्यात येईल.
मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी SwiftChatया Application मधील “PAT Live Report” या Bot द्वारे आपल्या शाळेचा PAT निकाल अहवाल डाउनलोड करावा.
सदर Bot ची लिंक: https://links.swiftchat.ai/klGsN9
PAT Live Report डाउनलोड करण्याबाबतचे सविस्तर User Manual खालील लिंकवर उपलब्ध आहे:
https://tinyurl.com/42stufew
SwiftChara VSK संदर्भातील शंका-समाधान व सद्यस्थिती अद्ययावत माहितीसाठी WhatsApp Community Link:https://tinyurl.com/PATLIVEREPORT










