जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत teacher intra district transfer
संदर्भ: १
) शासन निर्णय क्र. जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४, दि.१८.६.२०२४.
२) शासन पत्र क्र. न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१०५/आस्था-१४, दि.७.११.२०२५.
महोदय,
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतचे धोरण संदर्भ क्र. १ येथील दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक संदर्भ क्र. २ येथील दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्यये विहीत करण्यात आले आहे. या विहीत वेळापत्रकानुसार मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांच्याकडून सन २०२५ ची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलव्दारे पार पडली आहे.
२. सदर बदली प्रक्रियेदरम्यान विविध जिल्हा परिषदांच्या शिक्षकांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे याचिका दाखल केल्या आहेत. सदर दाखल याचिकांपैकी काही याचिकांमध्ये मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीस विविध टप्प्यांवर पुढील आदेशापर्यंत अंतरिम स्थगिती दिलेली होती. त्यामुळे सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या ज्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांच्या शिक्षकांच्या बदलीस अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे, अशा प्रकरणांमध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी व याचिकाकर्त्या शिक्षकांच्या बदलीबाबतची वस्तुस्थिती प्रतिज्ञापत्राव्दारे तात्काळ मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून मा. न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याबाबत कार्यवाही करण्याची आपणांस विनंती आहे. जेणेकरुन सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेदरम्यान देण्यात आलेल्या
बदली आदेशांची पूर्णतः अंमलबजावणी होईल. अन्यथा, अशा शिक्षकांच्या बदली आदेशास मिळालेली स्थगिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम आगामी बदली प्रक्रियेवर होईल.










