महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले होते. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले होते.

TET परीक्षा प्रसिद्धी निवेदन PDF download

एकूण ३७ जिल्यांच्या मुख्यालय ठिकाणी १४२३ केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ परीक्षा अयोजित केल्याप्रमाणे परीक्षा विहित वेळेत पार पडली आहे. सदर परीक्षेचे नियंत्रण जिल्हा नियंत्रक कक्ष व राज्य नियंत्रण कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे पार पाडण्यात आले.

परीक्षेस प्रविष्ठ विद्याथ्यर्थ्यांची/उमेदवारांची उपस्थिती/अनुपस्थिती बाबतची सांख्यिकीय माहिती पुढील प्रमाणे.

सदर परीक्षा पेपर १ साठी ५७१ केंद्र तर पेपर २ साठी ८५२ केंद्रावर CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले होते. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊनये म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत खालील सुविधांचा वापर

करण्यात आला.

१. CCTV कॅमेरे :-

कॅमेन्याचे Live Access a Artificial Intellignce Based Serveilliance, Frisking (HDMI), परीक्षाथ्यर्थ्यांची बायोमेट्रीक व Face Recognition व्दारे पडताळणी करण्यात आली.

२. Photo View

उमेदवारांचे (Proxy Exam Prevention) फोटो व नावे आपल्या या परीक्षेमधील उमेदवारांसोबत पडताळणी करण्यात आली आहे. (Historical Analysis) एक उमेदवार व दोन वेगवेगळे फोटो (Morphed Photo Detection) किया एकच फोटो मात्र दोन वेगवेगळी नावे (Impersonation Prevention) असलेल्या विद्यार्थ्यांची/उमेदवारांची यामुळे परीक्षेपूवी तसेच परीक्षेच्या वेळी देखील बोगस /डमी विद्याथ्यांची ओळख करण्यात आली आहे.

3. Connect View

प्रत्येक परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा संनियंत्रण कक्ष व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कक्ष यांचेकडे इंटरनेट फोन उपलब्ध करून देण्यात आले होते. या सुविधेमार्फत आवश्यकतेनुसार संबंधितांशी संपर्क साधला असून फोनच्या माध्यमातून दिवसभर नियमितपणे केंद्रसंचालकासाठी विविध सूचना एकाचवेळी निर्गमित केल्या गेल्या असून, सर्वानी सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसून आहे. तसेच सदर परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष व जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले.

४. सदर परीक्षेच्या दिवशी जिल्हयांतील मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षण सह संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय सहा. शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) सर्व, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उ/द/प) यांनी निरिक्षक म्हणून त्यांना दिलेल्या जिल्हयांतील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन अहवाल सादर केला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उपरोक्त सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी व परीक्षा पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी मदत झाली.

तसेच सर्व प्रसार माध्यमांनी परीक्षेबाबतच्या कार्यवाहीच्या वस्तुनिष्ठ बातम्या प्रसार माध्यमांना दिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेचे गांभीर्य व सुविधांची माहिती मिळाल्याने परीक्षा अत्यंत सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पडल्या आहेत.

राज्याच्या कंट्रोल रूम मधून CCTV कैमेन्ऱ्यांच्या (Live Access व Artificial Intellignce) माध्यमातून नांदेड जिल्हयातील एका केंद्रावर २ (दोन) विद्यार्थी व बीड जिल्हयातील एका केंद्रावार ६ (सहा) विद्यार्थी सातत्याने चर्चा करून प्रश्नांची उत्तरे’ लिहीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार समवेक्षकांना इंटरनेटद्वारे संपर्क करून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे घेऊन, संबंधित ८ (आठ) विद्यार्थ्यांना तात्काळ परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले व संबंधित समवेक्षकांवर रितसर चौकशी करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेच्या कामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे अधिकारी/कर्मचारी तसेच जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक योजना) सर्व, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उ/द/प) व या सर्वांच्या सहकार्याने सदर परीक्षेचे कामकाज व्यवस्थित पार पाडले

Related posts:

Leave a Comment