अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या, परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत caste validity certificate circular 

अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या, परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत caste validity certificate circular 

संदर्भ -: शासनाचे प्राप्त ई-मेल दिनांक ०१/१०/२०२६

उपरोक्त विषया संदर्भात शासनाकडून दिनांक ०१/१०/२०२६ रोजी ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यासअनुसरुन अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना वगळून, शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होऊनही अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करुन सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे.

तथापि, शासकीय सेवेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी नियमानुसार त्यांचे अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र संबंधित कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विवरणपत्रामध्ये सदर माहिती अद्ययावत व अचूक स्वरूपात सादर करण्यात यावी. तसेच, आपल्या समितीच्या कार्यक्षेत्रात अशी कोणतीही प्रकरणे नसल्यास “निरंक” अहवाल सादर करावा. सदर विवरणपत्राचा नमुना “अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या दाव्याची सद्यस्थिती” या नावाने गुगल ड्राईव्हवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सदर बाबीस प्राधान्य देऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

सोबतः- विवरणपत्राचा नमुना

Related posts:

Leave a Comment