सेवानिवृत्तीपूर्वी ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत retirement kalpanik vetanvadh
सेवानिवृत्तीपूर्वी ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने (मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर खंडपीठ) दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत
संदर्भ : वित्त विभागाचे क्र. न्यायप्र २०२६/प्र.क्र.३०/सेवा-९, दिनांक ५.१०.२०१६ रोजीचे पत्र
महोदया,
उपरोक्त विषयासंदर्भात नमूद करण्यात येते की, ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षकांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेल्या रिट याचिका क्र.१५६६२/२०२५ प्रकरणी म.ना.से. (सुधारित वेतन) नियम २००९ मधील नियम १० मधील तरतूदींचा उल्लेख करुन, सेवानिवृत्तीपूर्वी ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची सेवा पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त
कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात ग्राम विकास विभागाकडून पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे.
अशाच प्रकारच्या मा. उच्च न्यायालय, मुंबईच्या (औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर) खंडपीठामध्ये दाखल झालेल्या याचिकांप्रकरणी मा. न्यायालयानी, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या दिनांक १८.३.२०२६ रोजीच्या आदेशानुसार, आदेश दिले असल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व याचिकांमध्ये एकसमान मुद्दा असल्याने प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याबाबतच्या सूचना वित्त विभागाच्या संदर्भ क्र. न्यायप्र २०२६/प्र.क्र.३०/सेवा-९, दिनांक ५.१०.२०२६ रोजीच्या पत्रान्वये सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. (प्रत सोबत जोडली आहे.)
यास्तव प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने शासनाचा (वित्त विभागाचा) निर्णय झाल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये असे कळविण्यात येत आहे.











