इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश mdm shaley poshan aahar circular
विषयः- इंधन भाजीपाला देयके अदायगीकरीता अनुदान वितरण आदेश माहे ऑगस्ट-२०२६ (केंद्र/राज्य हिस्सा) लेखाशिर्ष (२२०२-३८०६/१७६४/१५३२)(२२०२-३८१५/०७३/५४१) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) आदेश.
संदर्भ:- शासन निर्णय क्र. आपोआ २०२४/प्र.क्र. १४४/एस.डी.३/१०९३४८०, दिनांक १२ जून, २०२५.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्याथ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. योजनेतर्गत शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे माहे ऑगस्ट २०२६ करिता इंधन भाजीपाला देयकाची अदायगी करण्याकरीता शाळास्तरावर अन्न शिजविणाऱ्या यंत्रणेचे इंधन भाजीपाला अनुदान MDM PORTAL मध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन माहितीच्या आधारावर संगणकीय प्रणालीद्वारे देयक जनरेट केले असून सदर जिल्ह्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यांना SNA SPARSH प्रणालीवर अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आदेश क्र.०४ अन्वये एकुण अनुदान केंद्र हिस्सा रक्कम रु.२४,३८,२२,१२०/- व राज्य हिस्सा रक्कम रु.१६,२५,४८,०८०/-अशी एकूण रक्कम रु.४०,६३,७०,२००/- (अवारी रक्कम रुपये चाळीस कोटी त्रेसष्ठ लाख सत्तर हजार दोनशे फक्त) आर्थिक वर्ष सन २०२६-२७ मध्ये राज्य स्तरावरील SNA-MH७ मध्ये आपल्या Component Code-B२ (इथन व भाजीपाला) ग्रामीण भागातील जिल्ह्यांकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहे.
१. छक्त अनुदानातून करण्यात येणारा खर्च लेखाशिर्ष २२०२-३८०६/१७६४/१५३२ (केंद्र हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२ व लेखाशिर्ष २२०२-३८१५/१७७३/१५४१ (राज्य हिस्सा) दत्तमत ३१ सहाय्यक अनुदानें (वेतनेत्तर) मागणी क्रमांक ई-२, एन-३ व टी-५ खर्च टाकण्यात यावा. (Componant Code-B2)
२. ज्या कारणासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, त्याच कारणासाठी ती खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी.
३. विवरण पत्रात नमूद केलेल्या अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र व मासिक खर्च अहवाल संचालनालयास सादर करावा, त्याशिवाय पुढील अनुदान वितरण करण्यात येणार नाही.
४. उक्त अनुदानातून देयके अदा करतेवेळी शासनाच्या प्रचलीत नियमांचे पालन करण्यात यावे.
५. जिल्हा निहाय मंजूर अनुदानाचा तपशील यासोबतच्या विवरण पत्रामध्ये देण्यात आला आहे.
६. इंधन व भाजीपाला देयकाची अदायगी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांची राहील.
सोबतः अनुदानाचे विवरण पत्र माहे ऑगस्ट-२०२६.











