पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी बैंड स्पर्धा आयोजित करणेबाबत band competition circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी बैंड स्पर्धा आयोजित करणेबाबत band competition circular 

संदर्भ : १. GOI, MOE, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha, PAB Minutes, F. No. १०-३/२०२६-SS.१. दिनांक १६ जून, २०२६.

2. Final Recommendation Sheet for Minutes (Samagra Shiksha of Maharashtra), GOI, MOE, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha, दिनांक १५ जून, २०२६.

3. PAB Detalls Sheet, Department of School Education & Literacy, Samagra Shiksha (Quality Intervention-Band Competition)

४. मा. राज्य प्रकल्प संचालक, MIP, मुंबई यांचे पत्र-SS/३००/२०२६-MPSP-PROGRAM /१/२४९२३९३/२०२६ दि. २८/०९/२०२६

4. Letter from Deputy Secretary to the Govt. of India F. No. 7-1/2026-PMP-2 Ministry of Education Department of School Education & Literacy, PM POSHAN Room No.21056, Kartavya Bhawan-02, New Delhi, dated 12th October, 2026

उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता ९ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील बैंड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, बैडच्या माध्यमातून कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे अशा उद्देशाने राष्ट्रीयस्तरावरील बैंड स्पधांचे आयोजन करण्यात येते.

सदर स्पर्धा राज्यस्तर, झोनल स्तर (राष्ट्रीय उपांत्य), राष्ट्रीयस्तर या ३ स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना खुली आहे. ज्यामध्ये CBSE, ICSE, KVS, NVS, PM- SHAI, व सैनिकी शाळा सुद्धा समविष्ट होणे अपेक्षित आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी, माध्यमिक व शिक्षण निरीक्षक यांचे सहकार्याने उपरोक्त नमूद सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून प्रस्तुत कार्यालयाकडील सदरच्या पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि बँडचे व्हिडीओ अपलोड करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि.१२/११/२०२६ ( वेळ-सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत) पर्यंत जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार https://sb/Rt. KortalTwcdota या लिंकमध्ये माहिती मरून व मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार पाईप बँडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप आणि ब्रास बैंडचा विद्यार्थी ग्रुप/विद्यार्थिनी ग्रुप अशा ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किया प्रत्येक प्रकारातील एक अशा संघाची नोंदणी करून व्हिडीओची लिंक पेस्ट करणे दि. १२ नोव्हेंबर, २०२६ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत लिंक भरणे अपेक्षित आहे. (व्हिडीओची लिंक पेस्ट करताना त्याला एडीटचा Access द्यावा.) तदनुषंगाने आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती कळवून जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतील असे पहावे, उपरोक्त विषया संदर्भात कोणत्याही कारणासाठी मुदत वाढविण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, बैंड स्पर्धाच्या विभागीय व राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांच्या सूचना आपणास स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. सदर बैंड स्पर्धेच्या आयोजना संबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी.

सोबत – १. मार्गदर्शक सूचना (२०२५-२६)

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment