महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ शुद्धिपत्रक mhaharashtra public service commision
-: शुद्धिपत्रक :-
022-Best
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
जाहिरात क्रमांकः ०१७/२०२६, दिनांक २५ जून, २०२६
आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून एकूण २६१९ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक २५ जून, २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाच्या दिनांक २२ जुलै, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षेमध्ये विविध नवीन संवर्गाचा समावेश करून एकूण ५७०७ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सदर शुद्धिपत्रकानुसार अर्ज सादर करण्यास दिनांक ०५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. तथापि, प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ देण्याबाबतची उमेदवारांची मागणी विचारात घेऊन प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 👇दिनांक १० ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 👇दिनांक १३ ऑगस्ट, २०२६ रोजी २३:५९ वाजेपर्यंत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बैंकिंग, UPI) शुल्क भरणे आवश्यक आहे.
२ सदर शुद्धिपत्रकानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाकरीता अर्ज सादर करणा-या उमेदवारांकरीता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक १० ऑगस्ट, २०२६ असा राहील.
३. शासनाकडून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाकरीता प्राप्त विविध जिल्हानिहाय मागणीपत्रांपैकी पेसा तसेच बिगर पेसा क्षेत्राकरीता विविध सामाजिक आरक्षणानुसार मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत. यापैकी चंद्रपूर
जिल्ह्यातील पेसा ” क्षेत्राकरीता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी पदे उपलब्ध झाली आहेत. ४.
सदर पेसा क्षेत्रातील आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार वाढ/बदल होऊ शकतो.
५. सदर शुद्धिपत्रकान्वये महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेतील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गासाठी (पेसा क्षेत्रातील) पदांसाठी अर्ज तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून विकल्प मागविण्यात येत आहे. सदर दाव्याच्या अनुषंगाने अर्ज/विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी पुढील सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहीलः-
(१) पेसा (PESA) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय. (२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसी२०१८/प्र.क्र.४२७/१६-ब, दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२३ तसेच शासनाकडून वेळोवेही प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक आदिवासी उमेदवारांमधून भरण्यात येतील.
(३) जे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी आजोबा संबंधित जिल्हयाच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दि. २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत. असे उमेदवार तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदासाठी अर्ज करू शकतील.
(४) शासन निर्णय, क्रमांक बीसीसी-२०१८/प्र.क्र.४२७/१६-ब, दिनांक १० मे, २०२३ आणि शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आविवि-२०२३/प्र.क्र.१३२/का-१४, दिनांक १६ जून, २०२३ मध्ये नमूद केल्यानुसार अनुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी संबंधित प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ पूर्वी दिलेले अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला सादर करणे अनिवार्य राहील.
(५) सदर उमेदवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याचाचत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत शासनामार्फत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रात (पैसा) नियुक्ती दिली जाईल.
(६) पेसा क्षेत्रासाठी आरक्षित पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी तसेच यापूर्वी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्जप्रणालीमध्ये पुढील बाब नमूद करणे अनिवार्य राहील :-
आपण पेसा क्षेत्रातील (चंद्रपूर) रहिवासी आहात का? होय नाही
(७) यापूर्वी प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी वरीलप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर प्रस्तुत दाव्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
६. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आरटीए-१०८२/३५०२/सीआर-१००/१६-अ, दिनांक ०२ सप्टेंबर, १९८३ व त्यानंतर शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या १५% पदांवर भरती करताना युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व आलेल्या माजी सैनिकांना १५% राखीव पदांपैकी उपलब्ध पदांवर प्राध्यान्य क्रमाने नियुक्ती देण्यात येईल. तसेच युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंतीक्रमाने वर्ग ३ मधील १५% आरक्षित पदांपैकी उपलब्ध पदावर नियुक्ती देण्यात येईल. तथापि सदर उमेदवाराने तलाठी पदासाठी आवश्यक अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.
७. उपरोक्त दाव्याच्या पृष्ठ्यर्थ उमेदवारांनी अर्ज सादर करताना ऑन लाईन अर्जप्रणालीद्वारे विचारलेल्या खालील प्रश्नांची उत्तरे नमूद करणे अनिवार्य राहील.
होय/नाही (अ) युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैन्यातील सेवेमुळे दिव्यांगत्व प्राप्त झाले आहे का ? (ब) युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा दिव्यांगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य आहात का? होय/नाही
८. वरील प्रश्नांचे उत्तर होय असल्यास उमेदवाराने प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक २५ ऑक्टोबर, २०२६ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
९ यापूर्वी विषयांकित परीक्षेकरीता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी, उपरोक्त माहिती सादर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीतील My Account या सदराखाली परीक्षेच्या नावासमोर संबंधित प्रश्नांच्या बटनावर क्लिक करावे व माहिती नमूद करावी.
१०. उपरोक्त दाव्यांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची नियुक्तीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल. सदर तपासणीवेळी उमेदवार संबंधित कागदपत्रे सादर करू शकला नाही, तर उमेदवार नियुक्तीस पात्र ठरणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.









