अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धोरण ठरविण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याबाबत engineering medical degree curriculum paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धोरण ठरविण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याबाबत engineering medical degree curriculum paripatrak 

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्र. समिती-२०२६/प्र.क्र.७८३/ई-१८३५३०८/तांशि-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, विस्तार इमारत मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १७ सप्टेंबर, २०२६.

संदर्भ :- आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांचे पत्र क्र. तंशिप्र-१२२६/प्र.क्र.२१/सीईटी/२०२६/२१३६, दि.०२.०९.२०२६

प्रस्तावना :-

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्तायादी निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक बदल करुन त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शासन स्तरावरुन तज्ञ समिती गठित करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांनी दिनांक ०२.०९.२०२६ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्यानुषंगाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी धोरण ठरविण्यासाठी तज्ञ समिती गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी पसेंटाईल व बारावी परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांचा विचार करुन गुणवत्तायादी निश्चित करण्याचे धोरण ठरविण्यासाठी खालीलप्रमाणे तज्ञ समिती गठित करण्यात येत आहे.

२. समितीची कार्यकक्षा :-

काळानुरूप बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा विचार करुन, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील शैक्षणिक कामगिरी आणि एमएचटी-सीईटी परीक्षेतील कामगिरी या दोन्ही घटकांना

योग्य प्रमाणात महत्त्व देऊन गुणवत्ता यादी निश्चित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यासाठी शिफारस करणे.

ii. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र या दोन्ही परीक्षांच्या निकालामध्ये समतोल साधता येईल तसेच, गुणवत्ताक्रम निश्चित करण्याची पद्धत अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ व सर्व उमेदवारांसाठी समतोल राहण्यास मदत होईल या उद्देशाने प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी कक्षाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या गुणवत्ता यादीकरिता बारावीचे गुण व सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांकन (Percentile) याचे प्रमाण समितीने निश्चित करावे.

बारावीचे गुण व सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांकन (Percentile) याचे प्रमाण गृहीत धरुन गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा सकारात्मक विचार झाल्यास, बारावीची परीक्षा व सीईटीची परीक्षा याची तयारी करण्यास उमेदवारांना पुरेसा अवधी राहील याचा विचार करून, त्याची अंमलबजावणी कधीपासून करता येईल याची शिफारस समितीने करावी.

समितीच्या अध्यक्षांना गरजेनुसार संबंधित विषय तज्ञांना बैठकीसाठी बोलाविण्याचा ३.

अधिकार असेल.

४. समिती १५ दिवसांत स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह सविस्तर अहवाल शासनास सादर करेल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२६०९१७१२५६०३४४०८ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment