शिक्षकांना TET अनिवार्यता, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी, संचमान्यतेचे धोरण, बीएलओ कामाच्या सक्तीचा त्रास, पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी व आंतरजिल्हा बदली इत्यादीबाबत tet blo vetanshreni paripatrak
विषय: बैठकीबाबत.
शिक्षकांना TET अनिवार्यता, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी, संचमान्यतेचे धोरण, बीएलओ कामाच्या सक्तीचा त्रास, पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी व आंतरजिल्हा बदली इत्यादीबाबत
महोदय,
मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे विशेष कार्य अधिकारी यांचे दि. १३.०७.२०२६ रोजीचे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे.
२. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक मध्यवती संघटना यांनी दि.०९.०७.२०२६, शिक्षक भारती यांचे दि. ०९.०७.२०२६ व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ सलग्न बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी दि. ०९.०७.२०२६ रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४.०७.२०२६ रोजी दुपारी ०२.०० वाजता त्यांचे मंत्रालयातील दालन क्र. ७०२, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
3. तरी, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती व संबंधित कागदपत्रासह बैठकीस उपस्थित राहावे, ही विनंती.









